वाहकाचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 धक्कादायक  घटना वाहकाचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

संगमेश्वर :- करजुवे येथून देवरुख आगाराची सकाळी 6.15 च्या दरम्यान सुटणारी वस्तीच्या गाडीच्या वाहकाचा चालत्या गाडीत ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला..

तुकाराम कुंडलिक माने वय वर्षे 42 असे वाहकाचे नाव आहे. त्याचे मूळ गाव जोडवाडी  बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई तालुक्यातील आहे.माने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर वाहकाच्या मृत्यूच्या घटनेने एसटी वाहक, चालकांमधून सुद्धा  हळहळ व्यक्त केली जात आहे.

मंगळवारी 18 फेब्रुवारी रोजी चालक बालाजी मनोहर कोपनर आणि वाहक तुकाराम कुंडलिक माने यांनी MH08BT/2682 या त्यांच्या ताब्यात देण्यात आलेल्या एसटी बसने  11.30 ते संध्याकाळी  5.30 पर्यंत  संगमेश्वर ते करजुवे अशा प्रवाशा  फेऱ्या करून  पुन्हा सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास संगमेश्वर येथून करजुवे वस्ती बस घेऊन गेले होते.

बुधवारी सकाळी 6.15 वाजता करजुवे (भोळे दुकान )येथून  प्रवासी घेऊन एसटी संगमेश्वर येथे येत असताना  भायजेवाडी मार्गे घारेवाडी येथे एसटी आली असता  वाहक तुकाराम माने याला चक्कर येऊन तो खाली पडल्याचे मोहन रघुनाथ गौतडे यांनी एसटी चालकाला सांगितले.चालकाने एसटी रस्त्याच्या बाजूला उभी करून वाहक तुकाराम मानेकडे विचारपूस केली असता त्याने अस्वस्थ वाटत असल्याचे  आणि छातीत दुखत असल्याचे सांगितले.

 

चालक बालाजी कोपनर यांनी वेळ न घालवता व प्रवाशांची मदत घेत  थेट संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयाकडे एसटी आणून तेथे वाहकाला उपचारासाठी दाखल केले मात्र  दाखल करण्यापूर्वीच तुकाराम याचा  मृत्यू झाल्याचे येथील डॉक्टरांनी घोषित केले.

 

दुर्दैवी आणि हृदय पिळवटून टाकणारे वृत्त समजताच देवरुख आगार व्यवस्थापक रेश्मा मधाळे, स्थानक प्रमुख कैलास साबळे तसेच वाहक आणि चालकांनी ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घेतली.मनमिळाऊ शांत स्वभावाचा सहकारी अचानक सोडून गेल्याने काही वाहक आणि चालकाना अश्रू अनावर झाले.

घटनेची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपाधीक्षक शिवप्रसाद पारवे, पोलीस उपनिरीक्षक राजेश शेलार, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कांबळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल बरगळे, पोलीस कॉन्स्टेबल बाबुराव कोंदल यांनी आकस्मिक मृत्यू झाल्याची नोंद केली आहे.

मृतदेह शवविच्छेदनसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.            बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई तालुक्यातील जोडवाडी गावातील 42 वर्षीय तुकाराम माने हा 2018 साली वाहक कम चालक म्हणुन देवरुख आगारात रुजू झाला होता.

दोन मुलगे आणि पत्नीसह देवरुख येथे त्याचे वास्तव्य होते तर इतर कुटुंबीय बीड जिल्ह्यात असलेलेल्या मूळ गावी राहतात.

 

 

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात