जि .प. शाळा पूर्णगड नं.१ शाळेत शिवजयंती शिवशाही वेशभूषेत व विविध उपक्रमांनी साजरी.
रत्नागिरी जि प शाळा पूर्णगड नं.१ ता. रत्नागिरी या शाळेत शिवजयंतीनिमित्त विद्यार्थी शिवशाही वेशभूषित आले होते. प्रथमतः ढोल- ताशांच्या गजरात प्रभात फेरी काढून शिवरायांविषयी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. तदनंतर लेझीमच्या तालावर वेशभूषेतील मुलांचे व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याविषयी मनोगते , काव्यरूपी कविता, विचार व्यक्त केले. सर्व शिक्षक वृंदांनीही शिवाजी महाराजांच्या कार्याची महती सांगितली. छत्रपतींच्या जीवनावर आधारित पोवाडे विद्यार्थ्यांना ऐकवण्यात आले. तसेच आम्ही शिवकन्या मराठमोळा नृत्या अविष्कार विद्यार्थ्यांनी सादर करून सर्वांची मने जिंकली. अशाप्रकारे विविध उपक्रमांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती शाळेत उत्साहात पार पडली. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ तारये मॅडम, सर्व सदस्य, सर्व पालक यांनी विशेष सहकार्य केले, कार्यक्रमाविषयी समाधान व्यक्त केले. या उपक्रमाच्या निमित्ताने शाळेच्या मुख्याध्यापिका भारती तायशेटे, शिक्षक- पूर्वा वाकडे, भारती शिंगाडे, राजेंद्र रांगणकर यांनी विशेष परिश्रम घेतले.