संजय गांधी निराधार योजनेतील महिलांना सहा महिन्यांपासून अनुदान नाही – कलेक्टर कचेरीवर लवकरच मोर्चा
अहिल्यानगर : संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थी विधवा आणि निराधार महिलांना गेल्या सहा-सात महिन्यांपासून अनुदान मिळाले नाही. यामुळे या महिलांवर आर्थिक संकट ओढवले असून, त्यांच्या हक्काच्या अनुदानासाठी लवकरच अहिल्यानगर कलेक्टर कचेरीवर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे.
श्रीरामपूर तालुक्यात ‘हयातीचा दाखला’ आणि ‘लाडकी बहिण योजना’ याच्या कारणावरून अनेक विधवा व निराधार महिलांचे अनुदान थांबवण्यात आले आहे. त्यामुळे या महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या अन्यायाविरोधात महिलांना न्याय मिळावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अ. प.) जिल्हाध्यक्ष निलेश भालेराव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन उभारले जात आहे.
मोर्चात सहभागी होण्यासाठी आणि नाव नोंदणीसाठी इच्छुक महिलांनी 9273637728 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
???? महिलांचे अनुदान पुन्हा सुरू करण्याची मागणी
???? शासनाच्या उदासीन धोरणाविरोधात लढा
???? निराधार महिलांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू राहणार
(रिपोर्ट: अहिल्यानगर
नंदकुमार बगाडे पाटील प्रतिनिधी)