तवसाळ पंचक्रोशी ची श्रीदेवी महामाई सोनसाखळी मंदिराचा कलशारोहण सोहळा अत्यंत जल्लोषपूर्ण व उत्साह पूर्ण वातावरणात साजरा
गुहागर _ तवसाळ गाव पंचक्रोशीतील जागृती देवस्थानमा माहेरवाशींची पाठराखीण अशी बिरुदावली मिरवनार्या व ब्रिटिशांनीही जिथे देव पण मान्य केले. अशी तवसाळ गाव पंचक्रोशीची ग्रामदैवत देवी महामाई, सोनसाखळी, देव रवळनाथ, त्रिमुखी, सोमजाई, मंदिरातील मूर्ती नवीन मंदिराचे कलशारोहण सोहळा धुम धडाक्यात साजरा झाला.अरबी समुद्र आणि शास्त्री नदी यांच्या संगमावर डोंगर दरीच्या कुशीत लोकवस्ती पासून दुर मात्र तवसाळ गाव पंचक्रोशीच्या मध्यभागी जुन्या मंदिराची जागा आज भव्य दिव्य अशा मंदिराने घेतले आहे.या भव्य दिव्य मंदिराचा कलशारोहण सोहळा, उद्धाटन मंदिर नुतनीकरण निमित्ताने सलग चार दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
14 फेब्रुवारी रोजी देवस्थानचे मानकरी राजेश रमेश सुर्वे यांचे घर ते महामाई मंदिर पर्यंत कलश मिरवणूक हजारो भक्तगणांच्या उपस्थितीत, सनई ढोल ताशा पारंपारिक वाद्यांच्या गजरामध्ये काढण्यात आली.रात्री स्थानिक सुरू भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
15 फेब्रुवारी रोजी शोडशोपचारे पूजन तसेच देवीला, रूपे लावण्याचा कार्यक्रम विधिवत करण्यात आला . सदर कार्यक्रमाला तालुक्यातील माहेरवाशीणी भक्तगण यांचा उस्फूर्त सहभाग लाभला होता.त्यादिवशी रात्री श्री भगवान लोकरे श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ भांडुप व श्री प्रमोद हरियाण श्री पावणादेवी प्रासादिक मंडळ घालवली तालुका देवगड या सुप्रसिद्ध भजन सम्राटांची डबलबारी कार्यक्रम आयोजित केला होता .
तसेच देवस्थापना होम हवन ,दुष्ट ओवाळणी व श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली होती .रात्री तवसाळ पंचक्रोशीतील बहुरंगी नमन कार्यक्रम आयोजित करण्यात आला .
सदर कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोचला होता.श्री महामाई संसारी मंदिराचा कलशारोहण सोहळा कार्यक्रमाला हजारो भाविकांनी हजेरी लावून देवीचे दर्शन घेतले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री मोहन गडदे अध्यक्ष ,सर्व पंच कमिटी व सर्व मान्यवर, ग्रामस्थ ,पदाधिकारी यांनी मेहनत घेतली .सदर कार्यक्रमासाठी तवसाळ पंचक्रोशीतील मुंबई निवासी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते
???? www. Ratnagirivartahar.in
________________
???? *तुमच्या बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क – ९९७०९७१६५५*
*आमच्या whatsup group साठी येथे क्लिक करा*????
https://chat.whatsapp.com/L2mwcu