रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ३ मार्च रोजी काँग्रेसचे लाक्षणिक उपोषण

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ३ मार्च रोजी काँग्रेसचे लाक्षणिक उपोषण

रत्नागिरी: महाराष्ट्रातील मच्छीमार व शेतकऱ्यांच्या ज्वलंत समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि राज्यातील महायुती सरकारच्या विरोधात असलेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर, रत्नागिरी जिल्हा काँग्रेसच्या वतीने ३ मार्च रोजी लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. हे उपोषण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित करण्यात आले आहे.

या आंदोलनाबाबत माहिती देताना रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष हारीस शेकासन म्हणाले, “शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिल्यानंतरही सरकार कोणतीही ठोस पावले उचलताना दिसत नाही. तसेच, मच्छीमारांचे प्रश्नही प्रलंबित आहेत. सत्तेत येण्यासाठी आश्वासनांचा पाऊस पाडणाऱ्या महायुती सरकारने सत्ता मिळाल्यानंतर मात्र शेतकरी, मच्छीमार आणि सामान्य जनतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.”

आरोग्य सेवेची दयनीय अवस्था

रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे ढासळली असून, सरकारी रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची मोठी कमतरता आहे. अनेक पदे रिक्त असून, शिकाऊ डॉक्टरांवर उपचार करण्याची जबाबदारी टाकली जात आहे. यामुळे गरीब रुग्णांचे हाल सुरू असून, महाराष्ट्र शासन जनतेच्या आरोग्यासोबत खेळ करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

आंदोलनाची प्रमुख मागणी

राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे ३ मार्च रोजी हे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. काँग्रेस पक्षाने या अधिवेशनात शेतकरी, मच्छीमार आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.

महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती

या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आणि माजी आमदार ॲड. हुस्नबानू खलिफे, रमेश कीर, सहदेव बेटकर, रूपाली सावंत, अनिरुद्ध कांबळे, रमेश शहा, टी. डी. पवार, विभावरी जाधव, हनीफ खलफे, अशोक जाधव, दीपक राऊत, ॲड. अश्विनी आगाशे यांसारखे काँग्रेसचे अनेक पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

काँग्रेस कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

रत्नागिरी जिल्हा काँग्रेस प्रभारी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मनेष राऊत यांनी सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. काँग्रेसच्या विविध विभागांचे पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, विद्यार्थी काँग्रेस, इंटक, अल्पसंख्यांक विभाग, अनुसूचित जाती-जमाती विभाग, ओबीसी सेल, पर्यावरण सेल आदी घटक या आंदोलनात सकाळी १० वाजता उपस्थित राहणार आहेत.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

लेखकांच्या सर्जनशील अभिव्यक्ती व्यासपीठ – नाट्यलेखन स्पर्धा

लेखकांच्या सर्जनशील अभिव्यक्ती व्यासपीठ - नाट्यलेखन स्पर्धा मुंबई : नवोदित तसेच, प्रस्थापित लेखकांच्या सर्जनशील अभिव्यक्तीस व्यासपीठ मिळावे, मराठी नाट्यसंपदा अधिक...
Read More
लेखकांच्या सर्जनशील अभिव्यक्ती व्यासपीठ – नाट्यलेखन स्पर्धा

प्रियांश आर्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे पंजाब किंग्सचा चेपॉकवर थरारक विजय

प्रियांश आर्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे पंजाब किंग्सचा चेपॉकवर थरारक विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे इंडियन प्रीमियर...
Read More
प्रियांश आर्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे पंजाब किंग्सचा चेपॉकवर थरारक विजय

आंबा-काजू उत्पादक आक्रमक! हेक्टरी २२ हजारांची मदत नाकारली; राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली मुंबईत धडकणार

आंबा-काजू उत्पादक आक्रमक! हेक्टरी २२ हजारांची मदत नाकारली; राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली मुंबईत धडकणार रत्नागिरीत बागायतदारांचा एल्गार; ४ एप्रिलला देवगडमध्ये होणाऱ्या...
Read More
आंबा-काजू उत्पादक आक्रमक! हेक्टरी २२ हजारांची मदत नाकारली; राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली मुंबईत धडकणार

ईडन गार्डन्सवर हैदराबादचा विजय; नितीश कुमार रेड्डीच्या अष्टपैलू खेळीने कोलकात्यावर ६५ धावांनी मात

ईडन गार्डन्सवर हैदराबादचा विजय; नितीश कुमार रेड्डीच्या अष्टपैलू खेळीने कोलकात्यावर ६५ धावांनी मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): , ईडन गार्डन्स, कोलकाता...
Read More
ईडन गार्डन्सवर हैदराबादचा विजय; नितीश कुमार रेड्डीच्या अष्टपैलू खेळीने कोलकात्यावर ६५ धावांनी मात

शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेमध्ये दैदीप्यमान यश

शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेमध्ये दैदीप्यमान यश अधिकारी घडविण्याची परंपरा कायम आबलोली (संदेश कदम) चिपळूण तालुक्यातील शरदचंद्रजी पवार...
Read More
शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेमध्ये दैदीप्यमान यश

लाखो रुपयांचे CCTV ठप्प; ZP शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

लाखो रुपयांचे CCTV ठप्प; ZP शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह रत्नागिरी :- निलेश रहाटे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग हयांचे ऑगस्ट...
Read More
लाखो रुपयांचे CCTV ठप्प; ZP शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्र मत्स्य निर्यातीत ऐतिहासिक वाढ; राज्याला देशात दुसरे स्थान

महाराष्ट्र मत्स्य निर्यातीत ऐतिहासिक वाढ; राज्याला देशात दुसरे स्थान नितेश राणे यांच्या पुढाकारामुळे कोकणातील मत्स्यव्यवसायाला चालना, कोळंबी निर्यातीत मोठी झेप...
Read More
महाराष्ट्र मत्स्य निर्यातीत ऐतिहासिक वाढ; राज्याला देशात दुसरे स्थान

स्वातंत्र क्रिडा मंडळ” भिमवाडा सांताक्रूझ (पश्चिम ) यांच्या वतीने

"स्वातंत्र क्रिडा मंडळ" भिमवाडा सांताक्रूझ (पश्चिम ) यांच्या वतीने किंग जॉर्ज वृध्दाश्रम- महालक्ष्मी येथे वयोवृध्दांना "भोजन दान" आणि जीवनावश्यक वस्तूंचे...
Read More
स्वातंत्र क्रिडा मंडळ” भिमवाडा सांताक्रूझ (पश्चिम ) यांच्या वतीने

नाटक करताना ऐक वेगळं चॅलेंज असतं ते आम्ही अनुभवतोय आणि ती मजा घेतोय – लेखक, दिग्दर्शक, अभिनेता संतोष पवार

नाटक करताना ऐक वेगळं चॅलेंज असतं ते आम्ही अनुभवतोय आणि ती मजा घेतोय - लेखक, दिग्दर्शक, अभिनेता संतोष पवार आबलोली...
Read More
नाटक करताना ऐक वेगळं चॅलेंज असतं ते आम्ही अनुभवतोय आणि ती मजा घेतोय – लेखक, दिग्दर्शक, अभिनेता संतोष पवार

मंथन जनरल नॉलेज परीक्षा २०२६- रत्नागिरी जिल्ह्यात रिद्धी लबडे प्रथम

मंथन जनरल नॉलेज परीक्षा २०२६- रत्नागिरी जिल्ह्यात रिद्धी लबडे प्रथम आबलोली (प्रतिनिधी) मंथन वेल्फेअर फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मंथन जनरल...
Read More
मंथन जनरल नॉलेज परीक्षा २०२६- रत्नागिरी जिल्ह्यात रिद्धी लबडे प्रथम