काताळे ग्रामपंचायत नूतन इमारतीचे उत्साहात उद्घाटन.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

काताळे ग्रामपंचायत नूतन इमारतीचे उत्साहात उद्घाटन…

गुहागर (प्रतिनिधी मंगेश जाधव) : काताळे ग्रामपंचायतीच्या नव्या इमारतीचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. माजी आमदार डॉ. विनय नातू, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष महेश नाटेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सरपंच सौ. प्रियांका सुर्वे यांच्या हस्ते या भव्य इमारतीचे लोकार्पण करण्यात आले.

१५ वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम

गुहागर तालुक्यातील काताळे, तवसाळ, तवसाळ खुर्द या महसुली गावांचा समावेश असलेल्या काताळे ग्रामपंचायतीसाठी स्वतंत्र इमारतीची मागणी अनेक वर्षांपासून होती. २२ जाने.२०१० रोजी तवसाळ ग्राम पंचायत विसर्जित होऊन नव्याने पडवे आणि काताळे ग्राम पंचायत निर्मितीची अधिसूचना प्राप्त झाली,त्यावेळचे ग्रामपंचायत उपसरपंच मधुकर अजगोलकर यांनी या प्रस्तावाची मंजूर साठी महत्वाची भूमिका आणि परिश्रम घेतले. त्यांच्याच विशेष प्रयत्नाने   काताळे ग्रामपंचायत अस्तित्वात आली. गावकऱ्यांनी विना मोबदला जागा उपलब्ध करून दिली, तसेच स्वतःच्या खर्चाने ग्रामपंचायतीसाठी अस्थायी इमारत बांधली. आता तब्बल १५ वर्षांनंतर महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत, माजी आमदार डॉ. विनय नातू, माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष महेश नाटेकर, माजी सरपंच निलेश सुर्वे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे जिल्हा नियोजन जनसुविधा योजनेतून २२ लाख आणि ग्रामनिधीतून ३ लाख असे एकूण २५ लाख रुपये निधी मंजूर होऊन नवी इमारत साकारली.

उद्घाटन सोहळा उत्साहात, पण शासकीय अधिकाऱ्यांची अनुपस्थिती खटकली

३ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ३ वाजता पार पडलेल्या उद्घाटन सोहळ्यात सरपंच प्रियांका सुर्वे, उपसरपंच प्रसाद सुर्वे आणि ग्रामपंचायत सदस्य यांची विशेष भूमिका राहिली. माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी श्रीफळ वाढवून, सरपंचांनी फीत कापून तर महेश नाटेकर यांनी नामफलकाचे अनावरण करून उद्घाटनाची औपचारिकता पूर्ण केली.

कार्यक्रमात बोलताना डॉ. विनय नातू यांनी शासकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, “ग्रामपंचायतीने अधिकृत निमंत्रण दिले असतानाही गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक आणि तालुकास्तरीय शासकीय अधिकारी उपस्थित राहिले नाहीत, हे अत्यंत खेदजनक आहे. शासनाचा पगार घेत असताना सरकारी कामांना पाठ फिरवणे हे अयोग्य असून, यावर कारवाईची मागणी केली जाईल.”

सभागृहाची मागणी, आणि लगेच आश्वासन

सरपंच प्रियांका सुर्वे यांनी आपल्या भाषणात ग्रामपंचायतीसाठी विस्तृत सभागृहाची आवश्यकता असल्याचे सांगताच, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष महेश नाटेकर यांनी लवकरच ही मागणी पूर्ण केली जाईल, असे आश्वासन दिले.

गावकऱ्यांचे योगदान आणि मान्यवरांचा सन्मान

ही भव्य इमारत कै. जयंत यशवंत जुवेकर यांनी ग्रामपंचायतीसाठी विना मोबदला दिलेल्या ४ गुंठे जमिनीत उभारण्यात आली आहे. त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचे नातू जयदीप जुवेकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात निलेश सुर्वे यांनी ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या प्रवासाचा आढावा घेत ग्रामस्थांचे आभार मानले.

प्रमुख उपस्थित मान्यवर…

या सोहळ्याला सचिन ओक, अशोक पवार, संदीप जोशी, उत्तम पवार, सुभाष कोळवणकर, रमेश कुरटे, विजय मोहिते, प्रदीप सुर्वे, जगदीश गडदे, मंगेश गडदे, शाम गडदे, सरपंच मुजीब जांबारकर, वनिताताई डिंगणकर, पोलीस पाटील सचिन रसाळ, तलाठी सचिन परदेसी, ठेकेदार अमोल पाटील, इंद्रनील भाटकर, ॲड. अपूर्वा बारगोडे, उद्योजक अरुण गांधी, संदीप साळवी अंगणवाडी सेविका, महिला बचत गट आदींसह ग्रामस्थ व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सांगता आणि आभार प्रदर्शन

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य मधुकर अजगोलकर यांनी केले, तर सरपंच प्रियांका सुर्वे यांनी उपस्थित सर्व मान्यवर, ग्रामस्थ आणि शासकीय सहकाऱ्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.

काताळे ग्रामपंचायतीची नवी इमारत – विकासाचा नवा अध्याय!

ही नवी इमारत ग्रामस्थांसाठी एक महत्त्वाचे प्रशासनिक केंद्र बनणार आहे. भविष्यात रोजगारनिर्मिती, कौशल्यविकास आणि पर्यटनाला चालना देण्याचे उद्दिष्ट ठेवून ग्रामपंचायत कार्यरत राहील, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन आबलोली (संदेश कदम)  गुहागर तालुक्यातील जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवा...
Read More
जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

रत्नागिरीत धाडसी 'मिडनाईट ऑपरेशन'; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई रत्नागिरी (प्रतिनिधी): राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश...
Read More
रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवा, पुणे आयोजित स्व. यशवंत...
Read More
भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू - वर मेळावा आयोजन . रत्नागिरी, दि. २९ मार्च (वार्ताहर) : रत्नागिरी तालुका भंडारी समाज...
Read More
रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन रत्नागिरी - संदीप शेमणकर  (शिवार आंबेरे) श्रमिक किसान सेवा समिती संचालित लोकनेते शामरावजी...
Read More
फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): बारसापारा क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीगच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात...
Read More
वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार राहुल अरुणोदय बॅनर्जीचं वयाच्या ४२ व्या वर्षी...
Read More
मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार

सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित

सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित ⭕ अमालिया स्त्री गौरव पुरस्कार व पेडणेकर ग्रूप तर्फे...
Read More
सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित

पाटपन्हाळे महाविद्यालयात ‘६३ मुन्स’च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन

पाटपन्हाळे महाविद्यालयात '६३ मुन्स'च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन गुहागर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी AI आणि Machine Learning कोर्सेसची सुवर्णसंधी; 'MKCL'...
Read More
पाटपन्हाळे महाविद्यालयात ‘६३ मुन्स’च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन

अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन

अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन पुणे (गुरुदत्त वाकदेकर): प्रा. जयंत खेडकर लिखित आणि स्नेहल प्रकाशन,...
Read More
अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन