गुहागर तालुका काँग्रेसच्या मागणीला यश – होळी सणासाठी ठाणे ते कुडली बंदरवाडी विशेष एस.टी. सेवा उपलब्ध…
गुहागर – ( सुजित सुर्वे) तालुका काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष श्री. मिलिंद आत्माराम चाचे यांनी होळी सणासाठी आपल्या गावी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून ठाणे ते कुडली बंदरवाडी या मार्गावर अतिरिक्त एस.टी. बससेवेची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एमएसआरटीसी) मंजुरी दिली असून, ही विशेष बससेवा 12 मार्च 2025 ते 13 मार्च 2025 दरम्यान उपलब्ध असणार आहे.
बसची वेळ व मार्ग:
ही बस ठाणे खोपट आगारातून रात्रौ ठीक 10:16 वाजता सुटेल आणि पुढील मार्गाने प्रवास करेल –
ठाणे – पनवेल – महाड – चिपळूण – मार्गताम्हाणे – शृंगारतळी – कोतळूक – शीर – अबलोली – मासू – सडेजांभरी – कुडली बंदरवाडी
ऑनलाइन बुकिंग उपलब्ध
ही बससेवा एस.टी. महामंडळाच्या अधिकृत ऑनलाइन तिकिट बुकिंग प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवाशांनी “Thane CBS Thane” ते “Kudali Bundarwadi (Kuiu)” असे टाकून तिकिट आरक्षित करू शकतात.
गुहागर तालुका काँग्रेसतर्फे सर्व नागरिकांना ही सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. होळी सणासाठी आपल्या गावी जाणाऱ्या प्रवाशांनी या विशेष सोयीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. मिलिंद चाचे यांनी केले आहे.















