चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने गावची कन्या एमबीबीएस डाँ. वेदश्री चव्हाण

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने गावची कन्या एमबीबीएस डाँ. वेदश्री चव्हाण

रुग्णसेवा हिच ईश्वरसेवा करण्याची संधी मिळाली-डाँ. वेदश्री चव्हाण

चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने गावची कन्या एमबीबीएस डाँ. वेदश्री चव्हाण

चिपळूण– चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने गावची कन्या व पुणेस्थित स्काँन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष निलेश चव्हाण यांची पुतणी डाँ. वेदश्री सूरज चव्हाण हिने नवी मुंबई महात्मा गांधी मिशन मेडिकल काँलेजमधून एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण होऊन मार्गताम्हाने पंचक्रोशीत डाँक्टर होण्याचा मान मिळवला. या यशाबद्दल बोलताना वेदश्रीने रुग्णसेवा हिच ईश्वरसेवा करण्याची संधी मिळाल्याची प्रतिक्रिया दिली.

बालपणापासूनच कुशाग्र बुध्दीमता लाभलेल्या वेदश्रीने अथक मेहनत घेऊन आपले डाँक्टर होण्याचे स्वप्न साकार केले. लहान असतानाच वडिलांचे अपघाती झालेले निधन याचे दुःख पचवून वेदश्रीने आपल्या आईचा भक्कम पाठिंबा व संपूर्ण कुटुंबाचे सहकार्य मिळवत हे यश प्राप्त केले. साहजिकच आपले चुलते उद्योजक निलेश चव्हाण यांची व संपूर्ण कुटुंबाची मायेची सावली वेदश्रीला मिळाली आणि तिने हे यशाचे शिखर गाठले. तिच्या या यशाबद्दल मार्गताम्हाने परिसरातून अभिनंदन होत आहे.

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️


Discover more from Ratnagiri Vartahar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

आणखी वाचा...