आबलोली येथे पाणलोट क्षेत्र रथयात्रा आणि जलसंधारण कार्यक्रम उत्साहात संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आबलोली येथे पाणलोट क्षेत्र रथयात्रा आणि जलसंधारण कार्यक्रम उत्साहात संपन्न

निर्मल ग्रामपंचायत आबलोली व पाणलोट विकास समीती आबलोली यांचा स्तुत्य उपक्रम

आबलोली येथे पाणलोट क्षेत्र रथयात्रा आणि जलसंधारण कार्यक्रम उत्साहात संपन्न

आबलोली (संदेश कदम) 

गुहागर तालुक्यातील आबलोली येथील स्वर्गीय वसंतराव नाईक पुरस्कार प्राप्त निर्मल ग्रामपंचायत आबलोली आणि पाणलोट विकास समीती आबलोली यांच्या संयुक्त विद्यमाने ८ मार्च २०२५ रोजी जागतिक महिला दिन व पाणलोट क्षेत्र रथयात्रा आणि जलसंधारण कार्यक्रम आबलोली येथे मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला

या निमित्ताने स्वर्गीय वसंतराव नाईक पुरस्कार प्राप्त निर्मल ग्रामपंचायत आबलोली येथे पाणलोट क्षेत्र रथयात्रा रथाचे गुहागरचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांचे शुभहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून आणि पाणलोट क्षेत्र रथाला पुष्पहार घालून झेंडा फडकावून रथयात्रा रॅलीला,विद्यार्थी रॅलीला प्रारंभ करण्यात आला हि रॅली निसर्ग वाचवा..!, पाणी वाचवा..!झाडे लावा,झाडे जगवा..!अशा गगनभेदी घोषणा देत चंद्रकांत बाईत माध्यमिक विद्यालय आबलोली या विद्यालयाच्या पटांगणात आली या पटांगणात रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक – २.० मृदा व जलसंधारण भविष्याचे संरक्षण यावर आधारित पथनाट्य सादरीकरण करण्यात आले

त्यानंतर डि. एड. कॉलेज आबलोली येथील भव्य सभागृहात जलसंधारण विभाग पाणलोट क्षेत्र प्रकल्प कार्यान्वित यंत्रणा निलम पालव मॅडम यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलीत करून जलपुजन, वृक्ष पुजन करण्यात आले त्यानंतर चंद्रकांत बाईत माध्यमिक विद्यालय आबलोलीच्या विद्यार्थीनींनी इशस्तवन गीत सादर केले त्यानंतर ग्रामपंचायत अधिकारी श्री. बाबूराव सुर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले त्यानंतर उपस्थित सर्वांनी जल संरक्षण, मृदा संरक्षण शपथ ग्रहण केली.

त्यानंतर राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्राप्त आबलोली गावचे सुपुत्र आणि प्रगतशिल शेतकरी सचिन कमलाकर कारेकर यांना पंचायत समिती गुहागरचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत “पाणलोट योद्धा” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, सन्मानित करण्यात आले. त्यानंतर आबलोली गावातील बचत गटांच्या सीआरपी सौ. मिनल संदेश कदम यांना दिल्ली येथील भुमी संधारण विभागाच्या टेक्निकल एक्सपर्ड श्वेता नारायण मॅडम यांचे हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत “पाणलोट धारिणीताई” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, गौरवण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते आबलोली आणि आबलोली पंचक्रोशीतील आजी, माजी सरपंच यांचा तसेच महिला पदाधिकारी यांचा जाहीर सत्कार करण्यात आला त्यानंतर मान्यवरांनी मौलिक मार्गदर्शन केले.

यावेळी विचारपीठावर पंचायत समिती गुहागरचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे, जलसंधारण विभाग पाणलोट क्षेत्र प्रकल्प कार्यान्वित यंत्रणा आणि कार्यक्रम अध्यक्षा निलम पालव मॅडम, दिल्ली येथील भुमी संधारण विभागाच्या टेक्निकल एक्सपर्ड श्वेता नारायण मॅडम, जिल्हा समन्वयक जस्मिन गार्दी, तालुका कृषी अधिकारी अमोल शिरसागर, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग गुहागरचे उप अभियंता मंदार छत्रे, आबलोलीच्या सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके, ग्रामपंचायत अधिकारी बाबूराव सुर्यवंशी, काजुर्ली गावच्या सरपंच सौ. मेघना मोहिते, काजुर्लीचे माजी सरपंच डॉ. आनंद जोशी, आबलोली तंटामुक्ती समीती अध्यक्ष आप्पा कदम, मुख्याध्यापिका सौ. नेत्रा रहाटे, उपसरपंच अक्षय पागडे, सचिन कारेकर,सौ.मिनल कदम आदी. मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमानंतर डि. एड्. कॉलेज आबलोलीच्या परिसरात जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती सौ. स्नेहल सचिन बाईत, डॉ. सौ. गौरी काटदरे, आबलोलीच्या सरपंच सौ. वैष्णवी नेटके, बचतगटाच्या सीआरपी सौ. मिनल कदम आणि ग्रामपंचायत उपसरपंच,सदस्य यांचे हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली. आणि प्रथम सत्रातील कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या संपूर्ण कार्यक्रमाला आबलोली मधील महिला, पुरुष, विद्यार्थी बहूसंख्येने उपस्थित होते

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के