वैश्य- वाणी समाज पडवे चे अध्यक्ष पदी श्री अनंत (बाळू) गांधी यांची बिनविरोध निवड.…
गुहागर – (वार्ताहर) तालुक्यातील पडवे येथील पोलिस पाटील असणारे श्री.अनंत ( बाळू) गांधी यांची नुकत्याच झाले ल्या सर्वसाधारण सभेत वैश्य – वाणी पडवे समाजाचे नूतन अध्यक्ष म्हणून फेर निवड करण्यात आली.
सदर ची सभा ही गणेश उत्सव निमित्त वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. सभेत उत्सवाचं नियोजन ते विविध सामाजिक,सांस्कृतिक विषयावर चर्चा करण्यात आली. सभेत खालील प्रमाणे नवीन कार्यकारणी ही जाहीर करण्यात आली.
अध्यक्ष- श्री.अनंत वसंत गांधी, उपाध्यक्ष – श्री.दिनेश सुधाकर कोळवणकर, सचिव – प्रवीण शशिकांत गांगण, सह सचिव – स्वप्नील मंगेश संसारे या तरुण कार्यकर्त्यांची पुन्हा फेर निवड करण्यात आली. कार्यकारणी निवडीचा ठराव श्री..सुभाष शंकर कोळवणकर यांनी मांडला तर अनुमोदन श्री. राजू लकेश्री यांनी दिला. निवडी नंतर सर्वांचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेचछा ही देण्यात आल्या.
या सभेला बहुसंख्य पडवे येथील वैश्य वाणी समांज बांधव उपस्थित होते. सदरची ची सभा ही खेळीमेळीचे चे वातावरणात पार पडली. सभेला श्री. राम कोळ वणकर, श्री.विनायक लाकेश्री, श्री.बापू गांधी, श्री.प्रकाश गांधी, श्री. अरविंद कोळवणकर श्री.मोरेश्वर कोळवणकर,श्री. शशिकांत गांगण आणि श्री.विनायक कोळवणकर.
आदी ज्येष्ठ ग्रामस्थ उपस्थित होते.