अंधेरी पूर्व येथे वर्षावास निमित्त भाद्रपद पौर्णिमा उत्साहात संपन्न..

अंधेरी पूर्व येथे वर्षावास निमित्त भाद्रपद पौर्णिमा उत्साहात संपन्न.. छाया – संदेश कदम.

अंधेरी पूर्व येथे वर्षावास निमित्त भाद्रपद पौर्णिमा उत्साहात संपन्न..! 

 

आबलोली (संदेश कदम)—-
अंधेरी पूर्व येथील सावित्रीबाई फुले नगर, सहार कार्गो रोड, सहार गाव येथील विश्‍वशांती बुध्दविहारात बौध्दजन पंचायत समिती शाखा क्रमांक ६५७ मधील विश्‍वदिप महिला मंडळ, सावित्रीबाई फुले रहिवाशी सेवा संघ तसेच विश्‍वशांती तरूण मित्र मंडळ यांच्या विद्यमाने वर्षावासाचे औचित्य साधून बुधवार दिनांक भाद्रपद पौर्णिमा आणि वर्षावास कार्यक्रम मालिका पुष्प ५ वे याचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षपद शाखा अध्यक्ष प्रकाश पवार यांनी भूषविले. या कार्यक्रमाला सामाजिक प्रबोधनकार भीमराव गमरे यांनी ” गूलामगिरीच्या पध्दती नष्ट करून गलिच्छ चालीरीतींना मुठमाती द्या..!” असा फार महत्त्वाचा विषय मांडताना देशातील बहुजन समाजाला हजारो वर्षे मनुस्मृतीच्या माध्यमातून मनुवादी आणि ब्राह्मणी व्यवस्थेने करीत असणारे भयानक अन्याय, अत्याचार आणि गुलामगिरी पध्दती, पण् या गुलामगिरीच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी , महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अशा महापुरुषांनी बहुजन समाजातील मागास वर्गीय लोकांचे जीवनाचे सोने केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील संपूर्ण पशु, प्राणी, तळागाळातील मानव जातीला संविधानाच्या चौकटीत राहून हक्क आणि अधिकार बहाल केले. बहुजन समाजातील प्रत्येक महिलेला. हिंदू कोड बिलच्या माध्यमातून अनेक अधिकार बहाल केले. आज आपल्या देशातील महिला शिक्षण, नोकरी, उच्च पदांवर कार्यरत झाल्या . परंतु सध्या आठ – दहा वर्षांत पुन्हा सामाजिक आणि बौद्धिक, गुलामगिरी पध्दती लादण्याचे काम वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून मनुवादी व्यवस्था करीत आहेत. आताचे सरकार त्यांच विचारांचं आहे. त्यांना हिंदुवादी ब्राह्मणांचे वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे आणि जवळ जवळ ते संविधान न जुमानता बहुजन समाजातील महिला – पुरुष यांच्या वर अन्याय – अत्याचार करीत आहेत. मनुवादी व्यवस्था लक्षात घेऊन बहुजन समाजातील प्रत्येक मनुष्याने जागृत झाले पाहिजे. त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान वाचले पाहिजे आणि आपल्या हक्क – अधिकारासाठी लढले पाहिजे. जर आजही आपण जागे झालो नाही तर, गुलामगिरीत जगण्याची तयारी ठेवा. अश्या प्रकारे अनेक उदाहरण देऊन उपस्थित असलेल्या अनुयायांना भीमराव गमरे यांनी प्रबोधन केले. या कार्यक्रमाला भिमराव गमरे यांचे मोठे बंधू यांचेसह सामाजिक महिला कार्यकर्त्या तसेच शाखेच्या सर्व आजी माजी, महिला -पुरुष पदाधिकारी आणि सभासद बंधू भगिनी व लहान – थोर मंडळींनी उपस्थित राहुन कार्यक्रमाला उपकृत केले.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव श्री. रविंद्र पवार आणि किशोर कासारे यांनी केले. उपाध्यक्ष, विश्वास सावंत यांनी धार्मिक विधी संपन्न केली. त्यानंतर अध्यक्षीय भाषण झाले शेवटी शरणतयने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्वांना अल्पोपहार देऊन कार्यक्रम संपन्न झाला.

https://chat.whatsapp.com/L2mwcucEQKdBtE5N3lmPrv

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें