शाळांमध्ये नियुक्तीपुर्वी चारित्र्य प्रमाणपत्र आवश्यक करण्याचे आदेश

शाळांमध्ये नियुक्तीपुर्वी चारित्र्य प्रमाणपत्र आवश्यक करण्याचे आदेश...

सरकारचा सुरक्षिततेसाठी निर्णय

रत्नागिरी :(वार्ताहर) – राज्यात मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे शाळांमधील मुली व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी खासगी शाळांमध्ये नव्याने रूजू होणारे शिक्षक तसेच अन्य कर्मचाऱ्यांना पोलिसांकडून चारित्र्य प्रमाणपत्र घेऊन ते शाळेत जोडावे लागणार आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने कडक पावले उचलली आहेत. शाळांमध्ये शिक्षक, मदतनीस, लिपिक तसेच अन्य कामांसाठी कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. मात्र काही संस्थाचालक कर्मचाऱ्यांची कोणतीही पडताळणी न करता अशा कर्मचाऱ्यांची नेमणूक करतात. शाळांमध्ये नवीन शिक्षक अथवा कर्मचारी नेमताना पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र घेतल्याशिवाय नोकरीत समावून घेता येणार नसल्याचे शासनाने जारी केलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात चारित्र्य प्रमाणपत्रासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच काही नवीन उपाययोजना लागू करण्याबाबत शासन निर्णय जारी झाले असून रत्नागिरी जिल्ह्यात या निर्णयाची माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागाकडून अंमलबजावणी करण्याबाबतच्या सूचना सर्व माध्यमांच्या शाळा व्यवस्थापनांना दIlya aahet

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें