गुहागर विधानसभा मतदारसंघातून आज एकाच दिवशी पाच उमेदवारांनी भरला अर्ज

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गुहागर विधानसभा मतदारसंघातून आज एकाच दिवशी पाच उमेदवारांनी भरला अर्ज.

शिंदेसेनेकडून राजेश बेंडल,मनसेकडुन प्रमोद गांधी,उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेकडून विक्रांत जाधव व अन्य दोन उमेदवारी अर्जांचा समावेश

गुहागर-(आशिष कारेकर)-

सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या गुहागर विधानसभा मतदारसंघात

सोमवारी 5 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.यामुळे गुहागर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अतिशय रंगतदार होणार हे निश्चित झाले आहे.    यापूर्वी विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी सर्वप्रथम उमेदवारी अर्ज दाखल केला होता.सोमवारी आणखी 5 उमेदवारी अर्ज येथून दाखल झाले आहेत.यामध्ये शिंदे सेनेकडून राजेश बेंडल यांनी तर मनसेकडून प्रमोद गांधी यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.राजेश बेडल यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत,जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर,यशवंत बाईत आदी तर मनसेच्या प्रमोद गांधी यांचा अर्ज दाखल करण्यासाठी मनसेचे वैभव खेडेकर, जिल्हाउपाध्यक्ष विनोद जानवळकर,तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर आदी उपस्थित होते.तर विक्रांत जाधव यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे,संदीप फडकले यांनी अपक्ष, प्रमोद आंब्रे यांनी राष्ट्रीय समाज पक्षाकडून आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजी जगताप यांच्याकडे दाखल केले.

Plz Join whatsup group ????

https://chat.whatsapp.com/L2mwcucEQKdBtE5N3lmPrv

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]