अंधेरी पूर्व येथे आज ‘संविधान दिन’चे आयोजन

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

अंधेरी पूर्व येथे आज ‘संविधान दिन’चे आयोजन

तळवली (मंगेश जाधव)….
‘मी प्रथम भारतीय आणि अतिमतः भारतीय’ संविधानाच्या सन्मानार्थ अंधेरी पूर्व येथील विश्वशांती बुध्दविहार, सावित्रीबाई फुले नगर, रहिवाशी सेवा संघ, सहार कार्गो रोड येथे बौध्दजन पंचायत समिती शाखा क्रमांक ६५७, विश्वदिप महिला मंडळ, सावित्रीबाई फुले नगर रहिवाशी सेवा संघ आणि विश्वशांती तरुण मित्र मंडळ यांच्या विद्यमाने आज २६ नोव्हेंबर २०२४ रोजी ‘संविधान दिन’ कर्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्त आज सायंकाळी ७ वाजता कायद्याचे अभ्यासक ॲड. राजेश कलोते हे प्रमुख वक्ते ‘भारतीय संविधान व लोकशाही’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. सदर कार्यक्रम शाखा क्र . ६५७ चे अध्यक्ष प्रकाश पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. सदर कार्यक्रमात परिसरातील नागरिकांनी तसेच शाखेच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी उपस्थिती राहण्याची विनंती एका पत्रकाद्वारे केली आहे.

???? Plz Join whatsup group & Chanel ????

???? https://chat.whatsapp.com/L2mwcucEQKdBtE5N3lmPrv

 

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]