सुयश कॉम्प्युटर्स सेंटर आबलोली येथे जागतिक साक्षरता दिन उत्साहात साजरा

सुयश कॉम्प्युटर्स सेंटर आबलोली येथे जागतिक साक्षरता दिन उत्साहात साजरा

गुहागर (प्रतिनीधी)…

गुहागर तालुक्यातील आबलोली येथील सुयश कॉम्प्युटर्स सेंटर आबलोली येथे जिल्हा परिषद आदर्श शाळा खोडदे नं. १ या शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांचे समवेत विद्यार्थांसाठी संगणक प्रशिक्षण कार्यशाळा नुकतीच उत्साहात संपन्न झाली. यावेळी आजच्या जागतिकीकरणात सर्वात महत्वाची भूमिका हि संगणकाचीच आहे हे त्रिकाल सत्य आहे. जागतिक साक्षरता दिना निमित्त जिल्हा परिषद आदर्श शाळा खोडदे नं. १ च्या विद्यार्थ्यांना सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोलीचे संचालक श्री. संदेश साळवी यांनी संगणका विषयी मौलिक विस्तृत माहिती प्रोजेक्टरच्या माध्यमाद्वारे दाखवून विद्यार्थ्यांकडून संगणक प्रात्यक्षिक सराव करून घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद आदर्श शाळा खोडदे नं. १ या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रिता गावंडे, सहशिक्षिका सौ. संध्या पाटील यांनी सुयश कॉम्प्युटर्स सेंटर आबलोली या सेंटरच्या सर्व टिमला धन्यवाद दिले. यावेळी सुयश कॉम्प्युटर्स सेंटर आबलोलीचे संचालक श्री. संदेश साळवी, संचालिका सौ. सावी साळवी, कर्मचारी शुभम सावंत, साक्षी सावंत, प्राजक्ता पवार, सिद्धी डिंगणकर यांचेसह विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें