४ डिसेंबर रोजी गुहागर तालुक्यातील काताळे येथे देवदीपावली व देवीचा जागर – गोंधळ

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

४ डिसेंबर रोजी गुहागर तालुक्यातील काताळे येथे देवदीपावली व देवीचा जागर – गोंधळ

पारंपारीक भजनाचा तिरंगी महासंग्राम
भैरी, कालकी,चंडकी ट्रस्ट काताळे यांचा स्तुत्य उपक्रम
आबलोली (संदेश कदम)…..
गुहागर तालुक्यातील काताळे येथे भैरी,कालकी,चंडकी ट्रस्ट काताळे या ट्रस्ट च्या संयुक्त विद्यमाने देवदिपावली व देवीचा जागर – गोंधळ या कार्यक्रमाचे औचित्य साधून गुहागर तालुक्यातील भैरी,कालकी,चंडकी ग्रामदैवत मंदिर काताळे येथे बुधवार दिनांक ०४ डिसेंबर २०२४ रोजी रात्रौ १०:०० वाजता पारंपरिक भजनाचा तिरंगी महासंग्राम आयोजित करण्यात आला असून या पारंपरिक भजनाच्या तिरंगी महासंग्रामात कोकण कला भूषण बुवा चंद्रकांत कदम यांचे पट्टशिष्य आणि श्री.दत्तप्रासादिक भजन मंडळ भांडुपचे भजन सम्राट बुवा श्री. भगवान लोकरे,तसेच संगीत रत्न बुवा विलास पाटील यांचे पट्टशिष्य श्री. लिंग माऊली प्रासादिक भजन मंडळ सांताक्रुज चे भजन सम्राट बुवा श्री. श्रीधर मुणगेकर आणि भजन महर्षी बुवा परशुराम पांचाळ यांचे पट्टशिष्य श्री. साई प्रासादिक भजन मंडळ मालाड चे भजन सम्राट बुवा श्री. रामदास कासले या नामांकित बुवांच्या पारंपरिक भजनाचा तिरंगी महासंग्राम आयोजित करण्यात आला असून गुहागर तालुक्यातील जनतेने या संपूर्ण कार्यक्रमाचा मोफत लाभ घ्यावा असे जाहीर आवाहन भैरी, कालकी,चंडकी ट्रस्ट काताळे या ट्रस्टच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

???? आमच्या whatsup ग्रुप ला Join करा ????????https://chat.whatsapp.com/L2mwcucEQKdBtE5N3lmPrv

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]