देवरुख महाविद्यालयात ‘एड्स’बाबतच्या जनजागृतीसाठी उपक्रम

देवरुख महाविद्यालयात ‘एड्स’बाबतच्या जनजागृतीसाठी उपक्रम

देवरुख— देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि रेड रिबन क्लब यांच्यामार्फत एड्स विषयीच्या गंभीरतेबाबत विद्यार्थी व सामाजिक जागृतीसाठी महाविद्यालयाच्यावतीने विविध कार्यक्रम-उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध गंभीर विषयांवरील सामाजिक जागृतीच्या उद्देशाने कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ३ दिवसाच्या पथनाट्य प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. पथनाट्य प्रशिक्षणासाठी विद्यार्थी साहिल जयदीप खेडस्कर आणि सहकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

जागतिक एड्स दिनानिमित्त विद्यार्थ्यांची जनजागृती फेरी आणि पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. जनजागृती फेरीचा आरंभ महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून शिवाजी चौक- ग्रामीण रुग्णालय, देवरुख- एस.टी. स्टॅन्ड, देवरुख पर्यंत होता. कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एड्स विषयीचे पथनाट्य महाविद्यालय परिसरात, ग्रामीण रुग्णालय, देवरुख आणि एस.टी. स्टँड, देवरुख या ठिकाणी सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. पथनाट्यमध्ये प्रणय कांबळे, साईराज भायजे, संकेत वाघमारे, मनीष रेवाळे, राज सावंत, प्रणय बारे, सृष्टी मानकर, विशाखा भोसले, सुकन्या बागवे, अन्वी प्रसादे, सलोनी सुर्वे आणि जान्हवी गुरव या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर आणि उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांनी विद्यार्थी व मार्गदर्शन शिक्षकांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी डॉ. स्वप्निल धने यांचे ‘एच. आय. व्ही. एड्स आणि जनजागृती’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. सीमा शेट्ये यांनी, तर प्रास्ताविक पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लूंगसे यांनी केले. डॉ. धने यांनी आपल्या मार्गदर्शनात एड्स या रोगाची लक्षणे, एड्स होण्याची कारणे, एड्स रोगाचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम, एड्सबाबतचे समाजात असणारे गैरसमज व उपाययोजना याबाबत सविस्तर माहिती दिली. डॉ. केतकी धने यांनी करिअर विषयक मार्गदर्शन करताना शासनाच्या विविध शैक्षणिक योजनांची सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांसाठी प्रा धनंजय दळवी यांनी पोस्टर आणि रांगोळीच्या फोटोंच्या साह्याने एड्स विषयीची गंभीरता विशद केली. कार्यक्रमाचे आभार प्रा. प्रवीण जोशी यांनी मानले. एड्स सप्ताहानिमित्त आयोजित विविध कार्यक्रम आणि उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. सीमा शेटये आणि प्रा. सुनील सोनावणे, प्रा. सीमा कोरे, प्रा. अभिनय पातेरे, प्रा. मयुरेश राणे, प्रा. स्वप्नाली झेपले, प्रा. देवयानी जोशी, प्रा. अनिकेत ढावरे, प्रा. पिया मोरे आणि प्रा. डॉ. प्रशांत नारगुडे यांनी मेहनत घेतली.

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें