गुहागर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात पाटपन्हाळे विद्यालयाचे सुयश

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गुहागर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात पाटपन्हाळे विद्यालयाचे सुयश

( समृद्धी आंबेकर , साना गोरीवले , वेदांत नाटेकर व ओंकार खैर द्वितीय )

आबलोली (संदेश कदम) …

गुहागर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन नुकतेच पालशेत विद्यालयात संपन्न झाले. सदर विज्ञान प्रदर्शनात न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयाने सुयश संपादन केले आहे. माध्यमिक गटातील निबंध स्पर्धेत समृद्धी आंबेकरने द्वितीय क्रमांक , दिव्यांग विद्यार्थी गटात प्राथमिक गटात साना मंगेश गोरीवले हिने द्वितीय क्रमांक , वेदांत उमेश नाटेकर याने माध्यमिक गटात दिव्यांग विद्यार्थी प्रतिकृती गटात द्वितीय क्रमांक , प्रयोगशाळा परिचालक सहाय्यक गटात ओंकार रमेश खैर यांनी द्वितीय क्रमांक संपादन केला आहे. प्राथमिक गटातील निबंध स्पर्धेत इयत्ता सातवीमधील कस्तुरी संतोष घाणेकर हिने उत्तेजनार्थ क्रमांक संपादन केला .माध्यमिक गटातील विद्यार्थी प्रतिकृती गटात शुभम पडवळकर व अथर्व विचारे यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावून सुयश संपादन केले आहे.

न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयातर्फे गुहागर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत प्राथमिक व माध्यमिक गटातील निबंध स्पर्धा , माध्यमिक गट प्रश्नमंजुषा स्पर्धा , प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थी प्रतिकृती विभाग , विज्ञान शिक्षक प्रतिकृती विभाग , प्रयोगशाळा परिचालक सहाय्यक प्रतिकृती विभाग , दिव्यांग विद्यार्थी विभागातील प्राथमिक गट व माध्यमिक गटात सहभाग नोंदवून तालुकास्तरीय सुयश संपादन केले आहे. प्राथमिक गटातील निबंध स्पर्धेत कस्तुरी संतोष घाणेकर हिने उत्तेजनार्थ क्रमांक, माध्यमिक गटातील निबंध स्पर्धेत समृद्धी सुरेश आंबेकर हिने द्वितीय क्रमांक संपादन केला. प्रश्नमंजुषा माध्यमिक गटात समृद्धी सुरेश आंबेकर व मृण्मयी दत्ताराम जाधव यांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थी प्रतिकृती प्राथमिक गटात ध्रुव पवार व अलोक पवार यांनी वॉटर अलार्म सिस्टीम प्रतिकृती सादर करून सहभाग नोंदवला .माध्यमिक गटात शुभम पडवळकर व अथर्व विचारे यांनी स्मार्ट व्हेइकल ही प्रतिकृती सादर करून उत्तेजनार्थ क्रमांक संपादन केला.दिव्यांग विद्यार्थी विभागात प्राथमिक गटात साना मंगेश गोरीवले – इयत्ता आठवी हिने वॉटर डिस्पेन्सर प्रतिकृती सादर करून द्वितीय क्रमांक संपादन केला .माध्यमिक गटात वेदांत उमेश नाटेकर याने सुपारी सोलणी यंत्र प्रतिकृती सादर करून द्वितीय क्रमांक संपादन केला. तसेच विज्ञान शिक्षक प्रतिकृती विभागात श्री.के.डी.शिवणकर यांनी अध्ययन अध्यापनात एआयचा वापर ही प्रतिकृती सादर करून सहभाग नोंदवला. प्रयोगशाळा परिचालक सहाय्यक विभागात श्री.ओंकार रमेश खैर यांनी प्रकाशीय संबोध ही प्रतिकृती सादर करून द्वितीय क्रमांक संपादन केला. गुहागर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनातील सुयशस्वी व सहभागी विद्यार्थी यांना विज्ञान शिक्षक के.डी.शिवणकर , ए.जे. मयेकर व विज्ञान शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले. गुहागर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सुयशस्वी व सहभागी विद्यार्थी तसेच विज्ञान शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक यांनी सहभाग नोंदवून सुयश संपादन केल्याबद्दल पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा सुचिता वेल्हाळ , सचिव सुधाकर चव्हाण व पदाधिकारी तसेच मुख्याध्यापक व्ही.डी.पाटील , पर्यवेक्षक जी.डी.नेरले , शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]