विसापूरमधील लोककलाकार शांताराम रामाणे यांचे निधन

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

विसापूरमधील लोककलाकार शांताराम रामाणे यांचे निधन

आबलोली ( संदेश कदम) -गुहागर तालुक्यातील विसापूर गावामधील विसापूर कुणबी ग्रामस्थ रहिवासी सेवा मंडळ मुंबई – गिरगावचे सदस्य व लोककलाकार , तमाशा कलावंत , प्रसिद्ध शाहीर कै. शांताराम सखाराम रामाणे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मुंबई गिरगाव येथे वयाच्या सुमारे ७० व्या वर्षी नुकतेच निधन झाले. विसापूर गावामधील प्रतिष्ठित नागरिक तसेच तमाशामधील हौशी कलाकार , नामवंत शाहीर म्हणून कै.शांताराम सखाराम रामाणे यांचे विसापूर गावासाठी योगदान लाभले आहे. कै. शांताराम रामाणे लोककलाकाराने अनेक कलाकारांना प्रोत्साहन देत लोककलाकार घडवण्यासाठी योगदान दिले आहे . कै.रामाणे यांच्या पश्चात पत्नी , मुली , जावई , नातवंडे , चुलते व नातेवाईक असा मोठा परिवार आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]