राजापुर-लांजा तालुका नागरीक संघाचा कलाश्री पुरस्कार अभिनेते सचिन काळे यांना जाहीर

राजापुर-लांजा तालुका नागरीक संघाचा कलाश्री पुरस्कार अभिनेते सचिन काळे यांना जाहीर

नवी मुंबई (मंगेश जाधव)-कलाक्षेञातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल प्रसिद्ध विनोदी अभिनेते सचिन काळे यांना राजापुर लांजा तालुका नागरीक संघ मुंबई या सस्थेतर्फे नाटककार ला.कृ.आयरे कलाश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. नाटक चित्रपट लोकनाट्य आदी मध्ये वैविध्येपुर्ण भुमिका साकारणारे सचिन काळे यांनी कोकणचा साज संगमेश्वरी बाज या सुप्रसिद्ध लोकनाट्य तील शिवराम हे लक्षवेधी पाञ लोकप्रिय केले आहे. यांचे त्यांनी सुमारे साडेचारशे प्रयोग केले आहेत कोकणातील विविध व्यक्ती रेखेचा बारकाईने अभ्यास करुन त्यांची देहबोली शब्दफेक आत्मसात करुन साकारलेली हि भुमिका लोकांच्या विषेश लक्षात राहीली. याशिवाय लावण्यसखी निर्वासित आदिराज्य नाट्यस्पधेतील नाटकामध्ये तसेच हँगटँग प्रेम श्री देवी प्रसन्न घरत गणपती संगित मानापमान एप्रिल 99शामची आई हे चित्रपट एक गाव भुताचा फु बाई फु हे दुरर्शन कार्यक्रम आंक्रीत झो स्वामी अवधुत चितंन आदी वेबसिरीज मध्ये लक्षवेधी भुमिका साकारल्या आहेत. राजापुर-लांजा तालुका नागरीक ग्रामिण मराठी साहीत्य संमेलन ३१जानेवारी ते २फेब्रुवारी दरम्यान लांजा तालुक्यातील वाटूळ येथे आयोजित करण्यात आले आहे या दरम्या हा पुरस्कार सचिन काळे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें