कोंढेतड कुवळेकरवाडीत श्रीगणेश जयंती उत्सवानिमित्त खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कोंढेतड कुवळेकरवाडीत श्रीगणेश जयंती उत्सवानिमित्त खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा

✍️ राजू सागवेकर | राजापूर

▪️ राजापूर शहरानजीकच्या कोंढेतड येथील श्रीगणेश मंदिर देवस्थान, कुवळेकरवाडी मंडळाच्या वतीने यंदाचा श्रीगणेश जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. उत्सव ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह संपन्न होणार आहे.

✅ ३१ जानेवारी: हळदीकुंकू समारंभ (दुपारी ३ वाजता)
✅ ३१ जानेवारी: खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा (रात्री ८ वाजता)
✅ १ फेब्रुवारी: श्रीगणेश जयंती उत्सव
✅ २ फेब्रुवारी: विहिरीवरील पूजा

कोंढेतड कुवळेकरवाडीत श्रीगणेश जयंती उत्सवानिमित्त खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा

▪️ शुक्रवारी, ३१ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता आयोजित ही स्पर्धा खुल्या स्वरूपाची असून, फक्त ३० स्पर्धकांना सहभाग घेता येणार आहे. यामध्ये इयत्ता पाचवीपासून पुढे कोणत्याही वयोगटातील स्पर्धक सहभागी होऊ शकतात.

???? बक्षिसे:
???? प्रथम क्रमांक: ₹3,001 + चषक
???? द्वितीय क्रमांक: ₹2,001 + चषक
???? तृतीय क्रमांक: ₹1,001 + चषक
???? उत्तेजनार्थ बक्षिसे: दोन विशेष स्पर्धकांना रोख पारितोषिक.

▪️ स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी २९ जानेवारीपर्यंत नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी खालील संपर्क साधावा –
???? मुकुंद सावंत: 9405474944
???? मुकेश कुवळेकर: 7517064553
???? प्रकाश शिंदे: 8446341599

▪️ श्रीगणेश मंदिर देवस्थान कुवळेकरवाडी मंडळाने भाविक, नागरिक आणि स्पर्धकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]