पीएमश्री जवाहर नवोदय विद्यालयात पराक्रम दिवसानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पीएमश्री जवाहर नवोदय विद्यालयात पराक्रम दिवसानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा

रत्नागिरी (प्रतिनिधी)

पीएमश्री जवाहर नवोदय विद्यालय पडवे रत्नागिरी येथे पराक्रम दिवसाच्या निमित्ताने प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारीला झाला.भारत सरकारने हा दिवस नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने समर्पित केला आहे. दरवर्षी नेताजींच्या जयंतीनिमित्त पराक्रम दिन साजरा करून त्यांचे स्मरण केले जाते आणि त्यांच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या योगदानाला आदरांजली वाहिली जाते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अदम्य भावनेचा आणि देशाच्या निःस्वार्थ सेवेचा सन्मान आणि स्मरण करण्यासाठी, भारत सरकारने देशातील लोकांना, विशेषत: तरुणांना प्रेरणा देण्यासाठी दरवर्षी २३ जानेवारी रोजी त्यांचा जन्मदिवस “पराक्रम दिवस” म्हणून साजरा करण्यात येतो. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याप्रमाणे प्रतिकूल परिस्थितीत धैर्याने वागणे आणि नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणे हा या मागील प्रमुख उद्देश आहे. पराक्रम दिवसाच्या निमित्ताने नवोदय विद्यालयात विशेष प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत पीएमश्री जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबरच गोडे-दाते ज्युनिअर कॉलेज राजापूर येथील बारा विद्यार्थ्यांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नवोदय विद्यालयाचे प्राचार्य श्री एस. बसवराज, उपप्राचार्य श्री एम. भेंडवडेकर, वरिष्ठ प्राध्यापक श्री योगेश सुरवाडे आणि श्री नागेश शेकडे तसेच गोडे-दाते ज्युनिअर कॉलेजचे विज्ञान विभागाचे प्रमुख प्राध्यापक अभिजीत घागरे तसेच अन्य सहकारी शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]