मुंढर नं. 1शाळेची स्वरा लांजेकर जाणार नासा, इस्रो भेटीला

मुंढर नं. 1शाळेची स्वरा लांजेकर जाणार नासा, इस्रो भेटीला

   गुहागर (प्रतिनिधी) –

रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षण विभाग मार्फत इस्रो भारत व नासा अमेरिका अंतराळ संशोधन भेटीसाठी घेण्यात आलेल्या जिल्हास्तर निवड चाळणी परीक्षेत जिल्हा परिषद शाळा मुंढर नं.१ या ग्रामीण भागातील शाळेतील विद्यार्थिनी कु.स्वरा साक्षी संतोष लांजेकर ही पात्र ठरली.

तसेच राज्याबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठीसुद्धा तिची निवड झाली आहे.स्वराने अत्यन्त चिकाटीने व जिद्दीने अभ्यास करून जिल्हा परिषदेने दिलेल्या संधीचे सोने केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. दशरथ कदम सर यांनी तिला मुलाखत व प्रात्यक्षिक यावर वैयक्तिक मार्गदर्शन केले.पदवीधर शिक्षक श्री. वैभवकुमार पवार सर व उपशिक्षक श्री. लक्ष्मण पारवे सर यांनी विज्ञान विषयाचे सखोल मार्गदर्शन केले. फिरती विज्ञान प्रयोग शाळेचे श्री. रवी खांडेकर सर यांनी प्रयोग, सहभाग यावर मार्गदर्शन केले. मुंढर हायस्कुलचे मुख्याध्यापक श्री. अनंत साठे सर व विज्ञान शिक्षक श्री. पराग कदम सर यांनी तिचा आत्मविश्वास वाढविण्यास मदत केली. अंजनवेल हायस्कुलचे मुख्याध्यापक श्री. गोरीवले सर आणि न्यू इंग्लिश स्कुल पाटपन्हाळेचे मुख्याध्यापक श्री. पाटील सर यांनी शाळेची प्रयोगशाळा प्रयोग,प्रात्यक्षिक करण्यासाठी उपलब्ध करून दिली . पदवीधर शिक्षक श्री. सुनील वाघे सर यांनी मार्गदर्शन केले.आई- वडिलांनी तिचे मनोबल वाढविले. शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी शुभेच्छा दिल्या. स्वराची जिद्द, चिकाटी, अभ्यासूवृत्ती आणि वरील सर्वांचे प्रयत्न यामुळे स्वराने हे उत्तुंग असे यशाचे शिखर गाठले आहे.

त्या निमित्ताने शाळा व्यवस्थापन समितीच्या सभेत अध्यक्ष श्री. सचिन चाळके, केंद्रप्रमुख श्री. विजय निकम साहेब, श्री. अनंत साठे सर, श्री पराग कदम सर, मुख्याध्यापक श्री. दशरथ कदम सर यांच्या हस्ते स्वरा व तिचे आई वडील यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पदवीधर शिक्षक श्री वैभवकुमार पवार,उपशिक्षक श्री. लक्ष्मण पारवे, मुंढर गावचे पोलीस पाटील श्री. नीलेश गमरे,श्री विनायक लांजेकर, श्री. प्रभाकर चव्हाण, सौ. मानसी शिर्के सौ. रसिका शिर्के श्री. यशवंत लांजेकर व अनेक पालक उपस्थित होते. सर्वांनी स्वराला पुढील प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें