जुवे ग्रामस्थांसोबत चर्चासत्र संपन्न – खारभूमी बंधाऱ्याच्या प्रस्तावाला गती

जुवे ग्रामस्थांसोबत चर्चासत्र संपन्न – खारभूमी बंधाऱ्याच्या प्रस्तावाला गती

 

✍️राजू सागवेकर/राजापूर

 

▪️ मा. सिध्दीताई शिर्सेकर यांच्या मार्गदर्शनाखाली देव अंजनेश्वर देवस्थान, मिठगवाणे येथे माननीय अपूर्वा ताई सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत जुवे ग्रामस्थांसोबत महत्त्वपूर्ण चर्चासत्र पार पडले.

 

▪️ या चर्चासत्रात जैतापूर ते धाऊलवल्ली खारभूमी बंधारा हा प्रस्तावित कांदळवन उद्यानासाठी व जुवे बेटावरील ग्रामस्थांसाठी कसा महत्त्वाचा आहे, यावर सखोल चर्चा झाली. बंधाऱ्याचा उपयोग कांदळवन उद्यानाकडे व जुवे बेटावर जाण्यासाठी पोहोच मार्ग म्हणून कसा होऊ शकतो, याविषयी देखील उपस्थितांनी आपली मते मांडली.

 

▪️ चर्चासत्रादरम्यान माननीय अपूर्वा ताई सामंत यांनी कार्यकारी अभियंता, रत्नागिरी, खारभूमी विभाग यांच्याशी थेट दूरध्वनीद्वारे संवाद साधला. या संभाषणात धाऊलवल्ली ते जुवे जैतापूर बंधाऱ्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी त्वरीत पाठवण्याबाबत तसेच त्यामध्ये कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत, याची विशेष काळजी घेण्यावर भर देण्यात आला.

 

▪️ या चर्चासत्राला प्रभागातील मान्यवर पदाधिकारी, ग्रामस्थ व स्थानिक नेते उपस्थित होते. प्रस्तावित बंधाऱ्यामुळे पर्यावरणपूरक विकासाला चालना मिळेल तसेच स्थानिक ग्रामस्थांना दळणवळणाच्या सोयीसाठी मोठा फायदा होईल, अशी आशा व्यक्त करण्यात आली.

Raju Sagvekar
Author: Raju Sagvekar

???? राजू सागवेकर ???? वार्ताहर (ग्रामीण ) - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमीपत्र ता.राजापुर - 416702

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें