मराठी भाषेचा अवमान प्रकरणी लांजा तालुक्यात शिवसेनेचा तीव्र निषेध!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मराठी भाषेचा अवमान प्रकरणी लांजा तालुक्यात शिवसेनेचा तीव्र निषेध!

 

लांजा – मराठी भाषेच्या अवमानकारक वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवत आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या लांजा तालुका शाखेच्या वतीने नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संबोधित करत निषेध व्यक्त करण्यात आला.

 

या वेळी जिल्हाप्रमुख श्री. दत्ताजी कदम, जिल्हा समन्वयक श्री. रविंद्रजी डोळस, शिवसहकारचे जिल्हा संघटक श्री. चंद्रकांत शिंदे, तालुकाप्रमुख सुरेश करंबेळे, तालुका महिला संघटक सौ. पूर्वा मुळे, तसेच लांजा तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक प्रवेश घारे यांच्यासह तालुक्यातील उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, युवा व महिला पदाधिकारी, आजी-माजी पदाधिकारी आणि ज्येष्ठ शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मराठी भाषेच्या अस्मितेचा अवमान सहन केला जाणार नाही असा इशारा दिला असून, संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. जर योग्य कारवाई झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]