उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत 23 मार्च रोजी परीक्षा      

उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत 23 मार्च रोजी परीक्षा.

                 गुहागर तालुक्यात १२६७ जण होणार नवसाक्षर

गुहागर _तालुक्यातील निरक्षरांना साक्षर करण्यासाठी केंद्र सरकार पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत 23 मार्च रोजी परीक्षा होणार आहे .या परीक्षेतून नव साक्षरांची साक्षरता तपासणी केली जाणार आहे.या परीक्षेत 1267 परीक्षार्थी प्रविष्ट होणार आहेत.केंद्र शासन पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम सन 2022- 23 ते सन 2026- 27 या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राबवण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे .ज्या शाळेतून उल्हास ॲपवर निरक्षर व्यक्तीची नोंदणी केलेली आहे परीक्षेत असणाऱ्या निरीक्षकाने रविवार 23 मार्च रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत जाऊन पायाभूत चाचणी परीक्षा घ्यावी .नोंदणीकृत निरक्षर व्यक्तींना परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्यासाठी शाळा मुख्याध्यापक, शिक्षक ,केंद्रप्रमुख ,सामाजिक कार्यकर्ते ,ग्रामस्थ ,स्वयंसेवक यांनी आवश्यक ते सर्व प्रयत्न करावेत असे आवाहन तहसीलदार परीक्षीत पाटील ,गटविकास अधिकारी शेखर भिलारे, गटशिक्षण अधिकारी रायचंद गळवे यांनी केले आहे .परीक्षेत जाताना शक्य असल्यास परीक्षार्थीनी स्वतःचा एक आयकार्ड साईज फोटो ,नोंदणी वर लावण्यासाठी आणावा .तसेच जन्मतारखेचा पुरावा म्हणून मतदान ओळखपत्र आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक इत्यादी पैकी कोणती एक ओळखपत्र असणे आवश्यक आहे .प्रश्नपत्रिका ही पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यांच्याशी संबंधित तीन भागांमध्ये विभागलेली असून एकूण 150 गुणांची आहे याच उत्तीर्ण होण्यासाठी 51 गुण आवश्यक असते.परीक्षेचा कालावधी तीन तासाचा असेल .तर दिव्यांगासाठी 30 मिनिटे ज्यादा वेळ देण्यात येणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी रायचंद गळवे यांनी आवाहन केले आहे

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें