सरकार-आंदोलकांमध्ये समेट झाल्यावर तिसऱ्या व्यक्तीने लुडबुड महाराष्ट्राच्या हिताची नाही! – संजय राऊत

♦️ सरकार-आंदोलकांमध्ये समेट झाल्यावर तिसऱ्या व्यक्तीने लुडबुड महाराष्ट्राच्या हिताची नाही! – संजय राऊत

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीवर सरकार आणि आंदोलकांमध्ये झालेला तोडगा समाजाने स्वीकारला असून आता या प्रकरणात तिसऱ्या व्यक्तीने उगाच लुडबुड करणे राज्याच्या हिताचे नाही, असे स्पष्ट मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.

राऊत म्हणाले की, “मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या, त्यांनी तोडगा स्वीकारला आणि समाधानी असल्याचे स्पष्ट केले. मराठा समाज, ओबीसी समाजही समाधानी दिसतोय. अशावेळी पुन्हा खुसपटं काढून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू नये. महाराष्ट्र शांत आहे, लोक अजूनही पेढे खात आहेत. त्यामुळे हा विषय मीडियानेही फार लांबवू नये.”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयमाने हा प्रश्न सोडवला, त्यांचे कौतुक करायला हवे, असेही राऊत म्हणाले. तर उपमुख्यमंत्री काय बोलतात, इतर नेते काय म्हणतात याकडे लक्ष देण्यात काही अर्थ नाही, कारण आंदोलनकर्तेच समाधानी आहेत, असे राऊत यांनी ठणकावले.

 

 


🔖 हॅशटॅग्स :

#संजयराऊत #मराठाआरक्षण #मनोजजरांगे #महाराष्ट्रराजकारण #उद्धवठाकरेगट #DevendraFadnavis #RatnagiriVartahar


📸 फोटो 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें