८ वर्षांनंतर का होईना GST वर मोदी सरकारची कुंभकर्णी झोप उघडली – मल्लिकार्जुन खरगे!

♦️ ८ वर्षांनंतर का होईना GST वर मोदी सरकारची कुंभकर्णी झोप उघडली – मल्लिकार्जुन खरगे!

काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल; जीएसटी सुलभीकरणात झालेला विलंब देशाच्या अर्थव्यवस्थेला घातक – खरगे

नवी दिल्ली : जीएसटी परिषदेने करस्लॅब कमी करून केवळ ५% आणि १८% एवढे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत करताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मात्र मोदी सरकारवर जोरदार टीका केली. “८ वर्षांनंतर का होईना, जीएसटीवर मोदी सरकारची कुंभकर्णी झोप उघडली”, असे त्यांनी म्हटले.

खरगे यांनी X वर पोस्ट करत सांगितले की, काँग्रेसने २०१९ आणि २०२४ च्या जाहीरनाम्यात जीएसटी २.० ची मागणी केली होती. पण मोदी सरकारने ‘एक राष्ट्र, एक कर’ या संकल्पनेचे “एक राष्ट्र, नऊ कर” मध्ये रूपांतर केले.

त्यांनी पुढे सांगितले की, उत्पन्नकर संकलन २४०% आणि जीएसटी संकलन १७७% वाढले तरी सरकारला Rate Rationalisation करायला आठ वर्षे लागली. राज्यांना महसूल तुटीची पाच वर्षांसाठी भरपाई मिळावी, तसेच एमएसएमई व लघु उद्योगांसाठी गुंतागुंतीची प्रक्रिया थांबवावी, अशी मागणीही त्यांनी केली.

खरगे यांनी आठवण करून दिली की काँग्रेस-यूपीए सरकारने २००५ मध्ये जीएसटी जाहीर केला होता. २०११ मध्ये प्रणब मुखर्जी यांनी विधेयक मांडले, मात्र भाजपने विरोध केला. आता मात्र भाजप विक्रमी जीएसटी संकलनाचे यश म्हणून कौतुक करते, अशी खरगे यांची टीका.

 


🔖 हॅशटॅग्स :

#GST #MallikarjunKharge #ModiGovernment #CongressVsBJP #GSTCouncil #IndiaEconomy #MSME #RatnagiriVartahar

📸 फोटो 

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें