पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी आपले जीवन देशाची एकता व अखंडता साठी सदैव समर्पित केले~रुपेश मालुसरे

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी आपले जीवन देशाची एकता व अखंडता साठी सदैव समर्पित केले

( जिल्हा सचिव रुपेश मालुसरे )

मुंबई प्रविणभाऊ पवार

अंत्योदयचे प्रणेते स्व. पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंती निमित्त वांद्रे पूर्व विधानसभा वाॅर्ड क्र.९४, भाजपा कार्यालय, एकताड़, साईबाबा रोड, खार (पूर्व) पंडितजींच्या प्रतिमेचे पुजन व हारफुले अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्याचबरोबर त्यांच्या जीवनावरील कथन आत्मनिर्भर भारत, विकसित भारत, स्वदेशी आपले करा यादी विषयांवर चर्चा चा कार्यक्रम झाला.

या प्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना उत्तर मध्य जिल्हा सचिव रुपेश मालुसरे म्हणाले की, ज्या काळात कोणतीही मिडीया नव्हती अश्या प्रतिकूल परिस्थितीत आपले मॅसेज व काम जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कठीण काम हि मंडळी करीत.

जेव्हा आपला देश उदयास आला तेव्हा त्यावेळी हिंदुत्ववादी विचारधारा रुजविण्याचे काम श्यामाप्रसाद मुखर्जी व पंडित उपाध्यक्ष यांनी केले. अंत्योदयची मुळ रजना पंडितजींनी केली अंत्योदय योजना म्हणजे समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत योजना व लाभ पोचविणे.

आता पंतप्रधान मोदीजी देशभर अंत्योदय योजनेतेच्या माध्यमातून सबसिडी गॅस, मुद्रा लोन, जनधन बँक खाते, मोफत रेशन, १२० युनिट विज मोफत, भाजीपाला साठी रुपये अकराशे आदी योजनेचा गरीबांना लाभ मिळवून देत आहे.

जिल्हा सदस्य लोक दवे म्हणाले की, पंडितजी यांचा १९१६ जन्म झाला ते सामान्य परिवारातील व्यक्ती होते. सन १९५१ साली जनसंघाची स्थापनानेचे संस्थापक सदस्य होते. पुढे ते १९६७ साली जनसंघाचे अध्यक्ष झाले होते. काही अल्पावधीतच त्याची हत्या झाली. पंडितजींनी देशासाठी खुप भरीव कामगिरी केली होती. या प्रसंगी जिल्हा व तालुकास्तरावरील
पंकज पांडे, संतोष राणे, हरेश मालुसरे, दिलीप पुजारी शैलेश उपाध्याय सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]