तळवली गावचे सुपुत्र मंगेश जाधव यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानीत

तळवली गावचे सुपुत्र मंगेश जाधव यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानीत

आबलोली (संदेश कदम)

तळवली गावचे सुपुत्र मंगेश जाधव यांना राज्यस्तरीय आदर्श पञकार पुरस्काराने सन्मानीत

गुहागर तालुक्यातील तळवली गावचे सुपुत्र मंगेश राजाराम जाधव हे गेली अनेक वर्ष पत्रकारितेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रश्न प्रसारित करत आहे. त्यांनी अनेक वृत्तपत्रामध्ये पत्रकार म्हणून काम केले आहे प्रमुखांने दै. कोकण गर्जना दै. सकाळ दै. पुढारी दै. प्रहार दै. सामान सा. कोकण एक्सप्रेस अशा अनेक वृत्तपत्र मध्ये कोकणातील ग्रामीण भागातील अनेक मुलभुत प्रश्न स्थानिक स्थरावरील समस्या प्रशासकीय कामकाजातील त्रूटी अत्यंत परखडपणे नि पक्षपातीपणे समाजासमोर आणल्या तळागाळातील सामान्य नागरिकाच्या समस्याना प्रभावीपणे वाचा फोडल्यामुळे अनेकवेळा प्रशासनाला या प्रश्नाची गंभीर दखल घेणे भाग पडले. विविध युट्युब चैनल मध्ये यशस्वीपणे जबाबदारी पार पाडत आहेत आधार महाराष्ट्र. रत्नागिरी वार्ताहर. दै. गुहागर सत्ता. दक्ष पोलीस टाइम्स. यांच्या माध्यमातून त्यांनी अनेक समस्याचा पाठपुरावा करत गरजु लोकांना न्याय मिळवून देण्यात महत्वपूर्ण भुमिका बजावली आहे. त्यांना या पुर्वीही मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचा राज्यस्तरीय प्रतिभारत्न पुरस्कार अखिल भारतीय पत्रकार संघ मुंबई यांचा राष्ट्रीय ऐकात्मता फेलोशिप यासारखे पुरस्कार प्राप्त झाले आहेत . त्यांच्या कार्याची महती आणि व्यापकता लक्षात घेऊनच दिशा महाराष्ट्राची या वेब पोर्टल आणि युट्युब चैनलचे मुख्य संपादक तुषारजी गौतम नेवरेकर चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दुसरे कवी संमेलन व सन्मान सोहळा 2025 चे आयोजन करण्यात आले होते. या सन्मान सोहळ्यात मुख्य संपादक तुषारजी गौतम नेवरेकर व मा. रोहीणी दिक्षित (कर्नाटक ) सामाजिक कार्यकर्ता यांच्या शुभ हस्ते मंगेश राजाराम जाधव यांना राज्यस्तरीय आदर्श पञकार पुरस्कार 2025हा पुरस्कार सन्मानपत्र तसेच आकर्षक सन्मानचिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले. याच सन्मान सोहळ्यात दिशा महाराष्ट्राची या वेब पोर्टल आणि युट्युब चैनलचे नवीमुंबई प्रतिनिधी म्हणून मंगेश राजाराम जाधव यांना कार्यक्रमाच्या अध्यक्षा व आदर्श प्राचार्य आणि सुप्रसिद्ध निवेदिका मा. अर्चना मोहीते यांच्या हस्ते नियुक्ती पत्र आणि ओळख पत्र देऊन सन्मानीत करण्यात आले. हा कार्यक्रम डाँ. बाबासाहेब आंबेडकर समता भवन सानपाडा नवीमुंबई येथे पार पडला कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून मा. चंद्रकांत जगताप. मा.इक्बाल मुकादम. मा. भाऊ साहेब कांबळे मा. माला मेश्राम. मा. डाँ. रोहिणी दिक्षित. मा. कवी सरकार इंगळी. मा. सुवर्णा कदम. कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा. अर्चना मोहीते उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. सपना नेवरेकर व चंद्रसेन जाधव यांनी केले

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें