आबलोली गावच्या सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके “राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ समाज रत्न पुरस्काराने सन्मानित”

आबलोली गावच्या सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके “राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ समाज रत्न पुरस्काराने सन्मानित”

आबलोली (संदेश कदम)

गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोली गावच्या सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके यांना “राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ समाज रत्न पुरस्कार 2026 “या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे .

“दिशा महाराष्ट्राची”यावेब पोर्टल आणि यूट्यूब चैनल च्या वतीने दिशा महाराष्ट्राची आयोजित जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्यातील सुमारे 50 नामवंत महिलांचा दिनांक 15 मार्च 2026 रोजी “राज्यस्तरीय माता सावित्रीबाई फुले सन्मान सोहळा” तसेच “राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ गौरव सोहळा 2026 ” मान्यवरांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. करण्यात आला आहे. सरपंच सौ .वैष्णवी वैभव नेटके यांच्यावर गुहागर तालुक्यातील धार्मिक, सामाजिक आणि राजकीय अशा सर्वच स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

यावेळी गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोली गावच्या सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता भवन, तेजस्विनी वर्किंग वुमन्स होस्टेल समोर, जुईनगर स्टेशन जवळ, सानपाडा नवी मुंबई येथे टेकिया अध्यक्ष आणि स्पंदन प्रकाशनचे संपादक चंद्रकांत जगताप यांचे शुभ हस्ते “राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ समाज रत्न पुरस्कार 2026” या पुरस्काराने मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे नीटनेटके नियोजन “दिशा महाराष्ट्राची” या वेब पोर्टल आणि आणि यूट्यूब चॅनलचे मुख्य संपादक तुषार नेवरेकर, संचालिका सौ. सपना तुषार नेवरेकर यांनी केले होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून रशीकांनी गर्दी केली होती.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें