आदर्श शाळा दोडवलीला ४५ हजारांचा लॅपटॉप भेट; रौप्यमहोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांना स्नेहभोजन व शैक्षणिक साहित्याचे वाटप

highlits

आदर्श शाळा दोडवलीला ४५ हजारांचा लॅपटॉप भेट; रौप्यमहोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांना स्नेहभोजन व शैक्षणिक साहित्याचे वाटप

 

जि.प. सदस्य प्रमोद गांधी यांचे शाळेसाठी योगदान; अशोक व अक्षता कांबळे दाम्पत्याचा सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

 

गुहागर | प्रतिनिधी :

गुहागर तालुक्यातील आदर्श शाळा दोडवली येथे सामाजिक बांधिलकीचा आदर्श ठरणारा प्रेरणादायी उपक्रम पार पडला. शाळेच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा परिषद सदस्य श्री. प्रमोद गांधी यांनी शाळेला डेल कंपनीचा सुमारे ४५ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप भेट देऊन विद्यार्थ्यांच्या डिजिटल शिक्षणाला हातभार लावला. या योगदानाबद्दल शाळा, ग्रामस्थ आणि महिला मंडळाच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

 

याच कार्यक्रमात श्री. अशोक यशवंत कांबळे व सौ. अक्षता अशोक कांबळे यांच्या विवाहाला ११ मे २०२६ रोजी २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले. तसेच विद्यार्थ्यांना जेवणासाठी डिश, शैक्षणिक साहित्य (पेन, पेन्सिल, रबर, शार्पनर), स्पोर्ट्स टी-शर्ट तसेच शाळेसाठी विविध स्टेशनरी साहित्य भेट देण्यात आले.

 

या कार्यक्रमास श्री. अशोक कांबळे, सौ. अक्षता कांबळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. प्रदीप जाधव, उपाध्यक्षा सौ. तृप्ती कांबळे, ग्रामपंचायत सदस्य श्री. संजय हुमणे, ज्येष्ठ नागरिक श्री. दामोदर कांबळे, श्री. दिनेश कांबळे, श्री. सुरज कांबळे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

 

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांचे व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि सामाजिक जाणीवा वृद्धिंगत करण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें