*विभागीय सी. के. नायडू क्रिकेट स्पर्धेत वाटद खंडाळा विद्यालयाच्या मुली उपविजेत्या*
*रत्नागिरी प्रतिनिधी :- निलेश रहाटे*
शालेय १९ वर्षांखालील कोल्हापूर विभागीय सी. के. नायडू क्रिकेट स्पर्धेत माध्यमिक विद्यालय वरवडे भागशाळा व श्रीम. पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालय, वाटद खंडाळा येथील मुलींच्या संघाने उपविजेतेपद पटकावले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी आणि वरवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत पाच जिल्हे व महानगरपालिका विभागातील मुलांचे आणि मुलींचे प्रत्येकी आठ संघ सहभागी झाले होते. स्पर्धेत चुरशीच्या लढती रंगल्या.
कर्णधार मनाली निंबरे,पूजा जाधव ,श्रेया मालप,निधी सावंत, रुताली रामाणी, सलोनि गुरव, तन्वी सावंत,संजना रामाने,ममता चौगुले,गौरी धनावडे,तेजस्वी धनावडे, इच्छा शिंदे,पूर्वा सावंत,प्रिया अजगोलकर,अंतरा वरवटकर,सलोनी रामाने हिच्यासह संघातील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. या संघाला डॉ. राजेश जाधव, अर्चना खानविलकर ,पल्लवी बोरकर यांचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेने सलग दुसऱ्या वर्षी स्पर्धेचे आयोजन करत सहभागी खेळाडूंसाठी नाश्ता, भोजन आणि क्रिकेटचे चेंडू विनामूल्य उपलब्ध करून दिले. या उत्तम व्यवस्थेबद्दल क्रीडाशिक्षक, प्रशिक्षक व पालकांनी समाधान व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र विचारे, उपाध्यक्ष नाथाशेठ आडाव, सचिव समीरशेठ बोरकर, संदीप सुर्वे,अनिकेत सुर्वे,मुख्याध्यापक शिवाजी जगताप,पर्यवेक्षक आनंदा पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे स्पर्धेच्या आयोजनासाठी सहकार्य लाभले.
या यशाबद्दल खेळाडू व मार्गदर्शकांचे अभिनंदन होत असून, वाटद खंडाळा विद्यालयाने आपली क्रीडा यशाची परंपरा कायम राखली आहे.











