अभिनेते मकरंद अनासपुरे यांची गुहागर पंचायत समितीला सदिच्छा भेट; नदी व धरणातील गाळ काढण्यासह विविध विषयांवर चर्चा

: अभिनेते मकरंद अनासपुरे यांची गुहागर पंचायत समितीला सदिच्छा भेट; नदी व धरणातील गाळ काढण्यासह विविध विषयांवर चर्चा

: सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे यांच्याकडून स्वागत; ‘नाना फाउंडेशन’च्या कार्याचे अनुभव केले शेअर

प्रतिनिधी (मंगेश जाधव):

प्रसिद्ध मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी आज गुहागर पंचायत समिती कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर आणि उपसभापती निलेश सुर्वे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन उत्स्फूर्त स्वागत केले.

पंचायत समितीच्या सभापती दालनात झालेल्या या भेटीदरम्यान गुहागर तालुक्यातील नदीतील गाळ काढणे आणि धरणातील गाळ काढणे यावर सविस्तर चर्चा झाली.

अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी गुहागर तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासकामांबाबत आणि पंचायत समितीच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजनांबाबत माहिती जाणून घेतली. सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे मकरंद अनासपुरे यांच्या या भेटीमुळे पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. त्यांनी नावाजलेल्या ‘नाना फाउंडेशन’च्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याचा अनुभवही यावेळी उपस्थितांसोबत शेअर केला.

या प्रसंगी अमरदीप परचुरे, सागर गुजर आदींसह पंचायत समितीचे पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. सभापती प्रणव पोळेकर यांनी अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी वेळात वेळ काढून पंचायत समितीला भेट दिल्याबद्दल आभार मानले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें