राजापूर नालासोपारा नवीन एस टी बस सेवा विरार (पूर्व) मनवेल पाडा पर्यंत सुरू करण्यासाठी मुंबईवासी चाकरमनी एकवटले

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

राजापूर नालासोपारा नवीन एस टी बस सेवा विरार (पूर्व) मनवेल पाडा पर्यंत सुरू करण्यासाठी मुंबईवासी चाकरमनी एकवटले

 

नालासोपारा – संदीप शेमणकर 

मोगरे राजवाडी पंचक्रोशी आणि आसपास पंचक्रोशीतील परिसरातील वाडी मंडळे गाव मंडळे, ग्रामस्थ यांच्या वतीने राजापूर आगारातून संध्याकाळी ४.०० वाजता सुटणारी राजापूर, धारतळे, आडिवरे, कशेळी, गावखडी, पावस रत्नागिरी, रामवाडी ठाणे मार्गे नालासोपारा आगार येथे येणारी एस टी बस विरार (पूर्व) मनवेल पाडा तलाव पर्यंत सुरू करण्यात यावी. अशी मागणी जोर धरू लागली होती.यासाठी रविवार दिनांक ३० मार्च २०२५ रोजी. सकाळी ११.३० वाजता नालासोपारा आगार येथे व्यवस्थापक यांना निवेदने देण्यात आली. व विनंती करण्यात आली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन आश्वासन दिलं आहे. आपली मागणी लवकरात लवकर पूर्ण करून एस टी बस सेवा विरार (पूर्व)मनवेल पाडा पर्यंत सुरू करण्यात येईल. १)तिवरे ग्राम एकवर्धक मंडळ,मुंबई, २)कांगापूर ग्रामस्थ मंडळ, मुंबई, ३)सडेवाडी ग्राम विकास मंडळ,मोगरे, ४)थारळीवाडी उत्कृष्ट मंडळ, मुंबई ५)श्री.विश्वकर्मा सुतार समाज मोगरे, ६)नवयुग ग्राम विकास मंडळ, भराडे, ७)गाऊडवाडी ग्राम विकास मंडळ, ८)अमर विकास मंडळ,मुंबई, मारवेली, धाऊलवल्ली

या सर्व मंडळाच्या सहकार्याने मुंबईवासी ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत निवेदने देण्यात आली. सर्व मुबई ग्रामस्थ मंडळ यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]