“बँकेतील व्यवहार मराठीतच करा” – मनसेची बँकांना ठाम मागणी
राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसेच्या शिष्टमंडळाची बँकांना भेट; आठ दिवसांत बदल दिसण्याची अपेक्षा
बँकेतील व्यवहार मराठीत करा – मनसेची बँकांना मागणी
रत्नागिरी – राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरी शहरतर्फे शहरातील सर्व बँकांना बँकेतील व्यवहार मराठीतच व्हावेत, तसेच ग्राहकांशी मराठीत संवाद साधावा, अशी मागणी करत निवेदन देण्यात आले.
जिल्हाध्यक्ष अविनाश सौन्दलकर, जिल्हा सचिव महेंद्र गुळेकर व उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष बाबय भाटकर यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबवण्यात आली. रत्नागिरी शहरातील विविध बँकांना भेट देत हे निवेदन देण्यात आले. आगामी आठ दिवसांत हे बदल प्रत्यक्षात दिसावेत, अशी अपेक्षा मनसेने व्यक्त केली आहे.
या प्रसंगी महिला शहराध्यक्षा संपदा राणा, कार्यालय प्रमुख शैलेश मुकादम तसेच इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
—