जिंदाल पोर्ट साठी अनधिकृत भराव आजही सुरूच,याला जबाबदार बंदर निरीक्ष शंकर महानवरच

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

जिंदाल पोर्ट साठी अनधिकृत भराव आजही सुरूच,याला जबाबदार बंदर निरीक्ष शंकर महानवरच

जयगड ग्रामस्थांचा सागरी मंडळ वर आरोप,पाठपुरावा करूनही महानवरांची कंपनीला साथ

समिर शिरवडकर-रत्नागिरी.

रत्नागिरी:- ( जयगड) :-जयगड जे एस डब्लू जिंदाल कंपनीने जयगड खाडी मुखाशी केलेले अनधिकृत भराव आणि महसुल विभागाची दोन वेळा झालेली दंडात्मक कारवाई,एका वेळेस भरलेला दंड,आणि दुसऱ्या प्रकरणात ३० ते ३५ एकर भराव करून तयार केलेली जमीन त्याचा अनधिकृत केलेले कामाचा दंड अजून भरला सुद्धा नाही, तोवर अजून एक अनेक एकर अनधिकृत भरावचे काम ग्रामस्थाच्या जमिनीत राजरोसपणे सुरू आहे.

तब्बल तिसऱ्या वेळेस जयगड मधील अनधिकृत भराव जामीनित सुरु असून त्यावर कारवाई करण्यासाठी आणि त्या बाबतीत संयुक्त पंचयादी करण्यासाठी तेथील ग्रामस्थांनी तक्रार अर्ज विविध विभागाकडे दिले होते, त्यात मुख्य म्हणजे ज्या विभागाचे काम आहे त्या विभागाचे अधिकारी शकंर महानवर -जयगड बंदर निरीक्षण यांनी त्या अर्जाला केराची टोपली दाखवली आहे,तब्बल मार्च २०२४ च्या पत्रावर आजही उत्तर महानवर ने अजून दिले नाही.या उलट तुम्ही आंदोलन करू नका, असे सांगून वेळ मारून नेऊन आम्हा ग्रामस्थांचे नुकसान केले आहे.आणि अनधिकृत कंपनीच्या भरावं कामाला मदत केली आहे,असा आरोप जयगड ग्रामस्थ करीत आहेत.

काही,वर्षपूर्वी करोडोचा दंड रत्नागिरी महसूल विभागाने बसविला होता,काही प्रमाणात तो दंड कंपनीने भरला सुद्धा,तो होता न होता,याच बंदर निरीक्षण यांच्या अध्यक्षतेखाली नवीन अनधिकृत भराव दि.२६/१२/२०२३ च्या मंडळ अधिकारी यांच्या अहवालानुसार सुमारे २५ ते ३० फूट टाकून ३० ते ३५ एकर जमीन अनधिकृत भराव टाकून तयार केलेचे आपल्या अहवालात म्हटले आहे.त्याचबरोबर इतर विभागाने म्हणजे भूमी अभिलेख, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी सुद्धा चौकशी करून आपल्या स्थरावर चौकशी करून अहवाल सादर करावा असे सुध्दा या अहवालात म्हटले आहे.परंतु,असे कोणतेही अहवाल प्राप्त नाहीत. मंडळ अधिकारी जयगड यांच्या अहवालानुसार रत्नागिरी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी पत्र क्र.१/अन.अक्र/कावी/37/2024 दि.20/06/2024 रोजी महाराष्ट्र अधिनियम 1966 कलम 44 व 45 च्या कारवाईस पात्र असलेचे पत्र दिले असुन आज वर यावर कोणत्याही प्रकरची कारवाई नाही.

त्याचप्रमाणे,काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा जयगड बंदर निरीक्षक शंकर महानवर यांच्या डोळ्यादेखत अनेक कोटीचा अनधिकृत भराव करण्याचे काम राजरोसपणे सुरू आहे.याबाबत सुद्धा तेथील ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्य देवयानी देविदास खाडे यांनी दि.03/12/24 ला तक्रार देऊनही महानवर यांनी आजपर्यंत कोणतीहि कारवाई केली नाहीं,केवळ पोकळ अश्वसना देत वेळ मारून नेत न्याय पासून वंचित ठेवले आहे.भविष्यात या बाबत आणि महाराष्ट्र सागरी मंडळ यांच्या विरोधात एक भलं मोठं आंदोलन उभं राहिल्याशिवाय राहणार नाही.

Samir Shirvadakar
Author: Samir Shirvadakar

???? समिर शिरवडकर ???? राजापुर तालुका - मिडिया को- ऑर्डीनेटर मु. पो. जैतापूर, ता. राजापुर जि.रत्नागिरी.

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार   गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे...
Read More
गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा