विज्ञान रंजन स्पर्धेत तळवली हायस्कूलचा झेंडा रोवला!
विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; मंथन साळवीचा जिल्हास्तरीय यशाने विशेष सन्मान
तळवली (मंगेश जाधव) | पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, तळवली (ता. गुहागर, जि. रत्नागिरी) येथील विद्यार्थ्यांनी रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ आयोजित विज्ञान रंजन स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. या विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे सचिव श्री. मंगेश जोशी व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. प्रदीप चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.
2024-25 या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या विज्ञान रंजन स्पर्धा तीन गटांमध्ये पार पडल्या.
गट १ मध्ये मंथन साळवी, कुस्वराज शिरकर व शुभ्रा शिंदे यांनी प्रथम क्रमांक मिळवला.
गट २ मध्ये तनुश्री कारेकर, वेदांत शितप व मिहीर वणे यांनी प्रथम श्रेणी मिळवली.
गट ३ मध्ये माही मयेकर, पायल धामणस्कर व समीरा जोशी यांनीही प्रथम श्रेणी मिळवली.
विशेष म्हणजे, गट १ मधील मंथन साळवी याने तालुकास्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक व जिल्हास्तरीय स्पर्धेत पंचम क्रमांक मिळवत संस्थेचा गौरव वाढवला. त्याचा ट्रॉफी, सन्मानपत्र व मेडल देऊन सत्कार करण्यात आला. त्याला संस्थेचे सचिव मंगेश जोशी यांनी रोख पारितोषिक देत विशेष कौतुक केले.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच मार्गदर्शक विज्ञान शिक्षक श्री. ओंकार पुनस्कर व सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. श्रीनाथ कुळे यांचा सन्मान केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक श्री. देवरुखकर सर यांनी तर आभारप्रदर्शनही त्यांनीच केले.
#विज्ञानस्पर्धा #तळवलीहायस्कूल #मंथनसाळवी #रत्नागिरीशिक्षण #विद्यार्थीयश #गुहागरन्यूज #TalukaLevelAchievements #RatnagiriNews #SchoolEvents