जि.प.प्रा.शाळा वाटद खंडाळा शाळेतील विद्यार्थ्यांचे ITSE परीक्षेत घवघवीत यश!
वाटद खंडाळा :- निलेश रहाटे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाटद खंडाळा (ता.जि. रत्नागिरी) येथील विद्यार्थ्यांनी भारतीय प्रज्ञाशोध परीक्षा (ITSE) 2024-25 मध्ये उज्ज्वल यश संपादन केले आहे. विशेषतः इयत्ता तिसरीतील विद्यार्थ्यांनी प्राविण्याची छाप सोडत शाळेचा व गावाचा गौरव वाढवला आहे.
यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे –
1. कु. रुद्र माधव अंकलगे – जिल्ह्यात ५ वा क्रमांक
2. कु. रुजिता प्रविण सुर्वे – केंद्रात प्रथम क्रमांक
3. कु. राजवीर अमोल पाटील – केंद्रात तृतीय क्रमांक
या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. मंजुषा झगडे, उपाध्यक्ष व सर्व सदस्य, इतर समित्या, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक वर्गाने सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
या विद्यार्थ्यांच्या यशात मोलाचा वाटा असलेल्या मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती मंजुश्री पाटील मॅडम यांचेही विशेष अभिनंदन करण्यात आले आहे.
शाळेच्या गुणवत्तेची ही ठळक पावती असून, हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे मत शिक्षक आणि पालकांनी व्यक्त केले.