वाटद खंडाळा जिल्हा परिषद शाळेमध्ये निरोप समारंभ सपन्न.
प्रतिनिधी :- निलेश रहाटे
रत्नागिरी तालुक्यातील वाटद खंडाळा, आज दिनांक ०९/०४/२०२५ वार बुधवार रोजी सकाळी १० वाजता इयत्ता ४ थी च्या विद्यार्थ्याचा निरोप समारंभ कार्यक्रम घेण्यात आला होता.या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. झगडे मॅडम , उपाध्यक्ष श्री.केशव कांबळे, सदस्य श्री विकास सुर्वे तसेच शाळेच्या मुख्याध्यापक सौ.बेंद्रे मॅडम , पालक वर्ग उपस्थित होते त्या सर्वांचे स्वागत व सूत्र संचालन शाळेच्या शिक्षिका सौ.पाटील मॅडम यांनी केले. सर्व उपस्थितांचे फुल देऊन स्वागत करण्यात आले.
इयत्ता १ ली, २ री व ३ री च्या मुलानी आपले मनोगत व्यक्त केले त्याच प्रमाणे इ.४ थी च्या मुलानी आपले मनोगत व्यक्त केले. त्या नंतर पाटील मॅडम यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.बेंद्रे मॅडम यांनी मुलांना मार्गदर्शनपर शुभेच्छा दिल्या. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ.झगडे मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर मुलांना शाळा व्यवस्थापन समिती मार्फत, पार्थ पवार, श्लोक झगडे यांच्याकडून मुलांसाठी भेटवस्तू देण्यात आली. इयत्ता ४ थी च्या मुलानी शाळेसाठी १२ लिटर चा कुकर व वर्गासाठी घड्याळ आणि ३ शिक्षिकासाठी व जेवण बनविणाऱ्या वाहिनी ना आणि अध्यक्षासाठी मुलांकडून भेटवस्तू देण्यात आली. तसेच इयत्ता ४ थी च्या मुलानी त्यांच्या वर्गशिक्षिका श्रीम.शेटे मॅडम यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला.त्यानंतर मुलांना खाऊ वाटप करण्यात आले व अशा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये निरोप समारंभ संपन्न झाला. वर्गशिक्षक शेटे मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले.