2025 ते 2030 दरम्यान सरपंच पदासाठी आरक्षण निश्चित २२ एप्रिलला तालुक्याच्या मुख्यालयात होणार सोडत प्रक्रिया

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

2025 ते 2030 दरम्यान सरपंच पदासाठी आरक्षण निश्चित

२२ एप्रिलला तालुक्याच्या मुख्यालयात होणार सोडत प्रक्रिया

 

रत्नागिरी – महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम, 1964 नुसार जिल्ह्यातील सरपंच पदांचे प्रवर्गनिहाय आणि महिलांसाठीचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. 2025 ते 2030 या कालावधीत गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी हे आरक्षण लागू राहणार आहे.

 

या आरक्षणाबाबतची सोडत प्रक्रिया २२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता तालुक्याच्या मुख्यालयात तहसिलदार कार्यालयात होणार आहे. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी याबाबत अधिसूचना जारी केली असून सरपंच पदाची संख्या तालुकानिहाय निश्चित करण्यात आली आहे.

 

शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या ५ मार्च 2025 रोजीच्या राजपत्रात प्रसिद्ध अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 च्या कलम 182 (4) आणि निवडणूक नियम 1964 मधील नियम 3(अ), 3(ब) व 4 च्या आधारे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग व सर्वसाधारण स्त्रियांसाठी नियमानुसार आरक्षण देण्यात येणार आहे.

 

या प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी यांनी सर्व तहसिलदारांना अधिकृत आदेशही दिले असून, या अधिसूचनेमुळे यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या अधिसूचना रद्द ठरवण्यात आल्या आहेत.

 

 

#सरपंचआरक्षण #ग्रामपंचायत2025 #RatnagiriNews #TalathiOffice #ग्रामविकासविभाग #पंचायतराज #MaharashtraPanchayatElection

 

 

 

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

bhaskr

Leave a Comment

आणखी वाचा...