अंधेरीत बाबासाहेब आंबेडकरांची १३४ वी जयंती जल्लोषात साजरी
ध्वजारोहण, जेष्ठ नागरिकांचा सन्मान, सांस्कृतिक कार्यक्रम आणि कव्वालीने कार्यक्रमाला रंगत
नवी मुंबई | प्रतिनिधी – मंगेश जाधव
अंधेरी पूर्व येथील सावित्रीबाई फुले रहिवासी कमिटी, बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ६५७, विश्वदीप महिला मंडळ आणि जयंती उत्सव कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात कमिटी अध्यक्ष दीपक जाधव व शाखा अध्यक्ष प्रकाश पवार यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. यानंतर जेष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि संविधानिक कार्यावर भाष्य केले.
सायंकाळी लहान मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने वातावरणात उत्साह संचारला. त्यानंतर प्रबोधन आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम असलेला कव्वाली कार्यक्रम सादर करण्यात आला. या सोहळ्याला विभागाचे आमदार पराग आळवणी, माजी नगरसेवक कमलेश राय व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्वदीप महिला मंडळ आणि स्थानिक नागरिकांनी मनःपूर्वक सहकार्य केले. शेवटी जयंती कमिटीने सर्व सहभागी रहिवाशांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली.
#डॉआंबेडकरजयंती #अंधेरीपूर्व #विश्वदीपमहिलामंडळ #बौद्धजनसमाज #सांस्कृतिककार्यक्रम #कव्वालीकार्यक्रम #आंबेडकरीचळवळ