गुहागर तालुकाध्यक्षपदी अभय भाटकर यांची भाजपकडून एकमुखाने निवड
संघटन पर्वात नेतृत्व बदल; माजी अध्यक्ष निलेश सुर्वेंचा उल्लेखनीय कार्यकाळ
तळवली (मंगेश जाधव):
भाजपच्या संघटन पर्वाच्या पार्श्वभूमीवर गुहागर तालुक्यातील हेदवी गावचे सुपुत्र अभय अशोक भाटकर यांची तालुकाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. ही निवड शृंगारतळी येथील भाजप संपर्क कार्यालयात पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रशांत शिरगावकर व निरीक्षक निलम गोंधळी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
भाजपच्या संघटन नियमांनुसार सलग अध्यक्षपद न देता येत नसल्याने मावळते अध्यक्ष निलेश सुर्वे यांचा तीन टर्मचा अपवादात्मक कार्यकाळ संपुष्टात आला. त्यांनी आपल्या कार्यकाळात संघटनात्मक ताकद वृद्धिंगत करण्यासाठी निःस्वार्थीपणे काम केल्याची दखल यावेळी घेण्यात आली.
नवीन तालुकाध्यक्ष अभय भाटकर हे संघ शाखेपासून कार्यरत असून, तालुका सरचिटणीस व जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली आहे. सामाजिक संस्थांमधूनही त्यांचे कार्य लक्षणीय राहिले आहे. “तालुक्यातील सर्व जेष्ठ, माजी पदाधिकारी व तरुण कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षबांधणीसाठी प्रामाणिक प्रयत्न करणार,” असे भाटकर यांनी सांगितले.
या निवडीप्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण शिगवण, श्रीकांत महाजन, तालुका सरचिटणीस सचिन ओक, रविंद्र अवेरे, उपाध्यक्ष मंगेश रांगळे, संदिप साळवी, अरूण गांधी, मंगेश जोशी, महिला आघाडीच्या अपूर्वा बारगोडे, शहराध्यक्ष नरेश पवार, संतोष सांगळे, प्रांजल कचरेकर, स्मिता जांगळी, श्रद्धा घाडे, विश्वास बेलवलकर, साईनाथ कळझुणकर, आशिष विचारे, संदिप कोंडविलकर, मुबीन ठाकुर, नरेश पवार, विनायक लांजेकर, इक्बाल पंची, नाना वराडकर, मुन्ना जैतपाल आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
#गुहागर #BJPNews #AbhayBhatkar #गुहागरभाजप #RatnagiriPolitics #TalukaAdhyaksha #संघटनपर्व #PoliticalUpdate #महाराष्ट्रराजकारण