भारतीय जनता पार्टी गुहागर तालुकाध्यपदी अभय भाटकर

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

भारतीय जनता पार्टी गुहागर तालुकाध्यपदी अभय भाटकर

आबलोली (संदेश कदम) 

भारतीय जनता पार्टी गुहागर या राजकीय पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी हेदवी गावचे सुपुत्र अभय अशोक भाटकर यांची एकमताने निवड करण्यात आली. शृंगारतळी येथील भाजपा संपर्क कार्यालयात प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रशांत शिरगावकर, निवडणूक निरीक्षक सौ.निलम गोंधळी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य भाजपाचे संघटन पर्व सुरू असून आज एकाच दिवशी सर्व नुतन तालुकाध्यक्षांची निवड प्रक्रिया पक्षाने दिलेल्या निरीक्षकांच्या उपस्थितीत पार पडली. भारतीय जनता पक्षाच्या घटनेमध्ये कोणाही व्यक्तीला सलग अध्यक्ष पद देता येत नाही. मावळते तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांच्याकडे अपवादात्मक परिस्थितीत मात्र गेली ३ टर्म ही तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी होती. ती त्यांनी यशस्वीपणे लिलया पेलून संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. त्यांना भविष्यात जिल्हा पातळीवर एखादी मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

भाजपाचे नव्याने अध्यक्ष झालेले हेदवी गावचे सुपुत्र अभय अशोक भाटकर हे संघ शाखेपासून कामकाज करत असून त्यानी तालुका सरचिटणीस, जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे.अनेक संस्थांमध्ये कार्यरत राहून त्यांनी सामाजिक क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. सर्वांना विश्वासात घेऊन गुहागर तालुक्यात भाजपाच्या सर्व जेष्ठ, आजी, माजी पदाधिकारी, तरूण वर्ग,कार्यकर्ते यांना एकत्रितपणे काम करण्यासाठी सहभागी करून घेऊन गुहागर तालुक्यातील भाजपाची संघटनात्मक बांधणी जोरदार करून ताकद वाढविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे तालुकाध्यक्ष अभय भाटकर यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण शिगवण, श्रीकांत महाजन, तालुका सरचिटणीस सचिन ओक, रविंद्र अवेरे, तालुका उपाध्यक्ष मंगेश रांगळे, संदिप साळवी, अरूण गांधी, मंगेश जोशी, महिला आघाडीच्या अपूर्वा बारगोडे, गुहागर शहराध्यक्ष नरेश पवार, संतोष सांगळे, प्रांजल कचरेकर, स्मिता जांगळी, श्रद्धा घाडे,विश्वास बेलवलकर, साईनाथ कळझुणकर, आशिष विचारे, संदिप कोंडविलकर,मुबीन ठाकुर,नरेश पवार , विनायक लांजेकर, इक्बाल पंची,नाना वराडकर, मुन्ना जैतपाल आदींसह भाजपाचे बहुसंख्य प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

bhaskr

Leave a Comment

आणखी वाचा...