गुहागर तालुक्यातील खोडदे गावचा सुपूत्र संदिप मोहिते यांच्या “माझ्या डोईवरी भरली घागर रे..!” या गौळण गाण्याचा अक्षरशः युटूबवर धुमाकूळ
अल्पावधीतच गाण्याला १ मीलियन असं मोठ यश
आबलोली (संदेश कदम)
कोकण माझी माय प्रोडक्शन या युटूब चॅनलचे संस्थापक आणि
“माझ्या डोईवरी भरली घागर रे..!” या गाण्याचे गीतकार आणि कमी शिक्षण झाले असले तरी पदवीधरांना लाजवेल अशी आपल्या लेखणीतून दमदार आणि उल्लेखनीय कामगिरी करणारे निसर्ग रम्य कोकणातील गुहागर तालुक्यातील खोडदे गावचे सुपूत्र संदिप मोहिते यांनी व्यवसाय संभाळून स्वरचित अनेक गाणी लिहिली आणि ती लोकप्रिय झाली आहेत.संदिप मोहिते यांनी नुकतेच “माझ्या डोईवरी भरली घागर रे..!”हे गौळण गाणे लिहिले आणि चालबद्ध केले असून या गाण्याने युटूबवर अक्षरश: धुमाकूळ घातला असून या गाण्याला अल्पावधीतच १ मीलीयन अस्ं मोठ यश मिळाले आहे.
हे गाणे कोकणात पूजेला आणि नमनाच्या प्रत्येक कार्यक्रमातहि तितकेच जोरदार वाजतय आणि गाजतयं
“माझ्या डोईवरी भरली घागर रे..!” या गाण्याला मायबाप रसिक जनतेने लोकप्रियतेच्या यशोशिखरावर नेले असून या गाण्याला गीतकार संदिप मोहिते यांनी चालबद्ध केले असून हे गाणे कुमारी रिया बैकर हिने सुमधुर स्वरात गायीले आहे.तर प्रणेश शिगवण, प्रभाकर मास्कर यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले आहे.तर या गाण्याचे म्युझिक प्रोडक्शन स्टुडिओ लाईन म्युझिक सुयोग साळवी यांनी केले असून कृष्णाच्या भुमिकेत रुपेश पाते, राधाच्या भुमिकेत रागिणी शितप या कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत तर इतर कलाकार म्हणून रुपेश पाते रागीनी शितप, सुयोग राणे, या गाण्याची व्हिडिओ ग्राफी रुपेश राऊत , रोहित माचीवले यांनी केली तर सौरभ अजगोलकर यांनी ड्रोनद्वारे व्हिडिओ ग्राफी केली आहे. “माझ्या डोईवरी भरली घागर रे..!” हे गाणं तुफान गाजतयं तसेच “येते माघारी जरा थांब”, भुलली मी कान्हा तुला” हि गाणी सुध्दा संदिप मोहिते यांनी लिहिली असून युटूबवर गाजत आहेत. कोकण माझी माय प्रोडक्शनची संपूर्ण टीम संदिप मोहिते यांना सहकार्य करीत असून यामध्ये कोरोग्राफर व गायक – राज कातकर,संगीत- सागर कदम, कलाकार – प्रथमेश शिगवण, चाफनाथ दसम, सुरेश दसम याचबरोबर शैलेश शितप, मधुकर दसम, रोहित सावंत, दिप्ती राऊत तसेच विकास मोहिते,महेश मोहिते आदींचे विशेष सहकार्य लाभले आहे.