:कोकणात परप्रांतीय ‘भैय्यां’ची चांदी; कवडीमोल दरात काजू-कोकमाची खरेदी
गावपातळीवरील दुर्लक्षाचा फायदा; स्थानिक महिला-शेतकरी गंडले जात असल्याची खंत
नवी मुंबई (मंगेश जाधव):
गुहागर तालुक्यात अनेक गावांमध्ये परप्रांतीय फेरीवाले, म्हणजेच ‘भैय्या’ व्यापाऱ्यांनी आपला जम बसवला असून, स्थानिक शेतकऱ्यांकडून कवडीमोल दराने काजू “बी” आणि कोकम फोडं विकत घेत असल्याचे चित्र पाहायला मिळते. हे फेरीवाले ग्रामपंचायतीकडून कोणतीही परवानगी न घेता गावागावांमध्ये फिरत आहेत.
सध्या एक किलो काजू “बी” फक्त 130 रुपयांना विकत घेतले जात आहे. हे व्यापारी बेकरीतून टोस वा बटर घेऊन थेट वाड्यांमध्ये पोहोचत आहेत. कोकम फोडंसुद्धा असाच व्यवहार पद्धतीने घेतले जात आहे. स्थानिक महिलांच्याच हातून घरगुती पद्धतीने हे व्यवहार चालतात.
अनेक तरुण नोकरी-व्यवसायासाठी मुंबईत असताना गावांमध्ये माताभगिनी अजूनही शेतीला धरून आहेत. मात्र काजू काढल्यानंतर योग्य बाजारपेठ किंवा हमीभावाबाबत मार्गदर्शनाचा अभाव असल्यामुळे या महिला परप्रांतीय व्यापाऱ्यांच्या बोलण्याला बळी पडतात.
शृंगारतळी, वेळंब, बोऱ्याफाटा, पालशेत, हेदवी, गुहागर, आबलोली यासारख्या नाक्यांवर काजूचे ढिगारे रचणाऱ्या या फेरीवाल्यांकडे एवढा माल कुठून येतो, याचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे.
प्रत्येक गावात भावकीच्या वाड्यांमध्ये कार्यरत असलेल्या मंडळांनी आणि तरुण पिढीने राजकीय झेंडे बाजूला ठेवून या आर्थिक गळतीकडे लक्ष दिले पाहिजे. स्थानिक किरकोळ विक्रेते, दुकानदार, काजू फॅक्ट्री चालक हेही शेतकऱ्यांना योग्य दर देण्यास तयार आहेत, पण त्यांच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे.
काजूचा हंगाम संपत आला असला, तरी कोकम आणि फोड्यांचा हंगाम आता भरात आहे. आता तरी सावध होण्याची वेळ आली आहे. काजू, कोकम, किंवा अन्य कोणतीही उत्पादने – शक्यतो आपल्याच माणसांशी व्यवहार करा. आपल्याच बांधवांनाही संधी द्या आणि गावच्या अर्थचक्रात ताकद निर्माण करा!
#गुहागर #काजूहंगाम #कोकमफोडं #भैय्यांचंथैय्यमान #KonkanCashew #LocalMarketSupport #गावउद्धार #परप्रांतीयव्यापारी #CashewScam #SupportLocalFarmers