पत्रकार पंडित लष्करे यांना ‘समाज रत्न’ पुरस्कार जाहीर!
शिवसंभू सामाजिक संघटनेतर्फे राज्यस्तरीय सन्मान; लिपणगांवच्या कार्यकर्त्याच्या कार्याची दखल
आहिल्यानगर (प्रतिनिधी – नंदकुमार बगाडे पाटील) –
लिपणगांव (ता. श्रीगोंदा) येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार पंडित लष्करे यांना शिवसंभू सामाजिक संघटनेच्या वतीने ‘समाज रत्न’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा राज्यस्तरीय सन्मान सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात येत्या मे 2025 मध्ये होणाऱ्या विशेष समारंभात प्रदान करण्यात येणार आहे.
या पुरस्काराची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अतुल मानेपाटील यांनी दिली. लष्करे यांनी धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याने त्यांची निवड करण्यात आली आहे.
ग्राहक जनजागृती मंच महाराष्ट्र राज्य या संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष असून, त्यांनी अनेक नागरिकांचे प्रश्न मार्गी लावले आहेत. विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप, ज्येष्ठ नागरिकांचे वैद्यकीय प्रश्न मार्गी लावणे, विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी – असे विविध उपक्रम त्यांनी राबवले आहेत.
स्वतःच्या दुःखाकडे दुर्लक्ष करत त्यांनी समाजासाठी आपले जीवन समर्पित केले. बहुजन समाजासाठी अहोरात्र काम करत ‘आबा’ या टोपण नावाने ते लिपणगांव परिसरात प्रसिद्ध आहेत.
या पुरस्कारानंतर श्रीगोंदा तालुक्यातील पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष नंदकुमार बगाडे पाटील, माजी आमदार शिवाजीराव नागवडे, कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे, समाज भूषण दादासाहेब शिरवाळे, शिवाजी ननवरे, माजी सरपंच बापूसाहेब ओव्हळ, जेष्ठ नागरिक मुढेकर मामा, पत्रकार बंधव व युवक मित्रांनी लष्करे यांचे अभिनंदन केले आहे.
हॅशटॅग्स:
#समाजरत्न #पंडितलष्करे #शिवसंभूसंघटना #लिपणगांव #श्रीगोंदा #सामाजिककार्यकर्ते #महाराष्ट्रपुरस्कार #पत्रकारगौ