कळंझोडी फाटा-वाटद पूर्व बौद्धवाडी रस्त्याचे लाखो रुपयांचे काम फुकट? RTI द्वारे उघड झाला संशयास्पद प्रकार!
१४ लाखांहून अधिक खर्चाचे रस्त्याचे काम ठेकेदाराने पूर्ण केले, पण आजवर मिळाले नाही एकही रुपया; प्रत्यक्ष काम करणारा ठेकेदार वेगळा?
प्रतिनिधी – निलेश रहाटे
रत्नागिरी – कळंझोडी फाटा २ ते वाटद पूर्व बौद्धवाडी या रस्त्यावर १४,६९,८७५ रुपये खर्चाचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग, रत्नागिरीतर्फे ठेकेदारामार्फत करण्यात आले. मात्र, RTI (माहितीचा अधिकार) द्वारे उघड झालेल्या माहितीनुसार अद्याप त्या ठेकेदाराला एकही रुपया देण्यात आलेला नाही.
२६ मे २०२४ रोजी हे काम सुरू असल्याचे लक्षात आल्यानंतर RTI कार्यकर्ते व पत्रकार निलेश रहाटे, संकेत ढवळे, यशवंत किंजळे आणि काही गावकरी यांनी रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली. गावचे सरपंच अमित वाडकर देखील यावेळी उपस्थित होते. पाहणीत रस्त्याचा निकृष्ट दर्जा स्पष्टपणे जाणवला.
या संपूर्ण कामात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली – टेंडर ज्या ठेकेदाराच्या नावावर आहे तो प्रत्यक्षात काम करत नसून दुसऱ्याच ठेकेदाराकडून काम करून घेतले जात आहे. शिवाय, ग्रामपंचायतीकडे कोणतीही अधिकृत माहिती न देताच हे काम चालू होते, असेही उघड झाले.
RTI कार्यकर्त्यांनी माहिती मागविल्यानंतरच रस्त्याजवळ ठेकेदाराची माहिती असलेला फलक लावण्यात आला, ही बाब अधिक संशयास्पद ठरते.
प्रश्न असा निर्माण होतो – लाखो रुपयांचे काम प्रत्यक्षात झाले, पण पैसे दिलेले नाहीत, तर ते फुकट का? आणि जर पैसे गेलेच असतील, तर ते काम इतक्या निकृष्ट दर्जाचे का?
हे प्रकरण आता एक वर्ष पूर्ण होण्याच्या मार्गावर असताना, संबंधित विभागाकडून कोणतीही स्पष्टता दिली गेलेली नाही. कामात दोष असूनही विभाग गप्प का? माहिती लपवली जात आहे का? अशा प्रश्नांनी स्थानिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
नागरिक व RTI कार्यकर्ते निलेश रहाटे यांनी या संदर्भात सखोल चौकशीची मागणी केली असून, अधिकाऱ्यांसमोर हे प्रकरण मांडण्यात येणार आहे.
हॅशटॅग्स:
#RTIRevelation #PublicWorksScam #RatnagiriNews #RoadScam #PWDQuestions #NileshRahate #Wadad #KonkanNews #JournalismForTruth