रायपाटण शाळेचा श्रीपाद चव्हाण नॅशनल स्कॉलर सर्च परीक्षेत राज्यात दुसरा
इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या श्रीपादने 200 पैकी 198 गुण मिळवत राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला; रायपाटण व येळवण गावात आनंदाचे वातावरण
राजापूर- संदीप शेमणकर
राजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा रायपाटण नं. १ मधील इयत्ता पाचवीचा विद्यार्थी श्रीपाद विठोबा चव्हाण याने नुकत्याच पार पडलेल्या नॅशनल स्कॉलर सर्च (NSSE) परीक्षेत घवघवीत यश संपादन करत राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्याने एकूण 200 पैकी 198 गुण मिळवून रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम क्रमांक, तर राज्यस्तरीय यादीत दुसरा क्रमांक मिळवला.
श्रीपादच्या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर गुरव, उपाध्यक्ष सिद्धेश चांदे, सर्व सदस्य, मुख्याध्यापिका सौ. नीलम थरवळ, रायपाटणचे सरपंच निलेश चांदे, हायस्कूलचे मुख्याध्यापक दामोदर लिंगायत, लिपिक संदीप कोलते, शिक्षक व पालकांनी त्याचे अभिनंदन केले.
या यशामागे श्रीपादच्या आई सौ. अनघा चव्हाण, वडील श्री. विठोबा चव्हाण व मुख्याध्यापिका थरवळ मॅडम यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. याआधीही श्रीपादने नवोदय व मंथन परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले असून त्याच्या येळवण गावासह संपूर्ण जिल्ह्यातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
#हॅशटॅग्स:
#NSSE #श्रीपादचव्हाण #रायपाटणशाळा #राजापूर #रत्नागिरीगौरव #शिक्षणातउत्कृष्टता #नॅशनलस्कॉलरसर्च #विद्यार्थीगौरव