महाराष्ट्राला देशातील क्रमांक एकचे मत्स्योत्पादन राज्य बनण्याची क्षमता – केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह
किनारपट्टीच्या राज्यांच्या मंत्र्यांची बैठक मुंबईत; महाराष्ट्राच्या ड्रोन प्रणालीचे कौतुक, LED मासेमारीवर बंदीची मागणी
मुंबई – मुंबईत ताज पॅलेस येथे पार पडलेल्या किनारपट्टी राज्यांच्या मत्स्यव्यवसाय मंत्र्यांच्या बैठकीत केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी महाराष्ट्रात देशात सर्वाधिक मत्स्योत्पादन करणारे राज्य होण्याची क्षमता आहे, असे सांगितले. महाराष्ट्र सध्या १३% वाटा घेऊन तिसऱ्या क्रमांकावर असून आंध्रप्रदेश प्रथम क्रमांकावर आहे. मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमारांसाठी घरे, LED मासेमारीवर बंदी आणि मासेमारी बंदी कालावधी एकसमान ९० दिवसांचा ठेवण्याची मागणी केली.
बैठकीत महाराष्ट्राच्या ड्रोन देखरेख यंत्रणेचे केंद्रीय पातळीवर कौतुक झाले. राज्यांनी शाश्वत मासेमारी व अवैध पद्धतींवर बंदी घालावी, असे आवाहन करण्यात आले. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेची यशस्वी अंमलबजावणी झाल्याचे सांगून, मत्स्य व्यवसायाने ३ कोटी लोकांना रोजगार दिल्याचेही अधोरेखित करण्यात आले.
हॅशटॅग्स:
#Matsyavyavasay #FisheriesIndia #NiteshRane #RajeevRanjanSingh #LEDFishingBan #DroneSurveillance #BlueRevolution #MaharashtraFisheries
फोटो